ठाणे: तरुणीने रॅपिडो बाईक बुक केली अन् निर्जन ठिकाणी नेऊन चालकाचं नको ते कृत्य!
कल्याण येथील एका रॅपिडो बाइक चालकवर तरुणीचा विनयभंग आणि घृणास्पद कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ठाण्यातील तरुणीने रॅपिडो बाईक बूक केली अन्...
निर्जन ठिकाणी नेऊन चालकाचं पीडितेसोबत नको ते कृत्य!
Thane Crime: ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे एका रॅपिडो बाइक चालकवर तरुणीचा विनयभंग आणि घृणास्पद कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. संबंधित घटना ही कल्याण पश्चिमच्या सिंडिकेट परिसरात घडली. पीडित तरुणीने जिमला जाण्यासाठी एक रॅपिडो बाईक बूक केली होती. त्यानंतर, आरोपी चालकाने पीडितेला निश्चित ठिकाणी न नेता एका निर्जन आणि अंधाऱ्या जागेत नेलं. त्यावेळी, आरोपीने तरुणीसोबत घृणास्पद कृत्य आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने आरडाओरडा केल्याने स्थानिकांनी तिला वाचवलं आणि चालकाला बेदम मारहाण केली.
पीडितेला निर्जन ठिकाणी घेऊन गेला अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने संध्याकाळी जिमला जाण्यासाठी रॅपिडो मोटरसायकर बूक केली होती. मात्र, पीडिता बाइकवर बसल्यानंतर आरोपी चालकाने अचानक त्याचा रस्ता बदलला. आरोपी तरुणीला निश्चित ठिकाणी नेण्याऐवजी कल्याण पश्चिम येथील पोलीस लाइनजवळ एका निर्जन आणि अंधाऱ्या ठिकाणी घेऊन गेला.
हे ही वाचा: मावळ हादरलं, 5 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार अन् गळा दाबून हत्या, संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट
स्थानिकांकडून भररस्त्यात बेदम मारहाण
त्या ठिकाणी आरोपीने पीडितेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, तरुणीने स्वत:ला वाचवण्यासाठी जोरजोरात ओरडण्यास सुरूवात केली. पीडितेच्या आवाजामुळे परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना तरुणीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. रॅपिडो चालकाच्या घृणास्पद कृत्याबद्दल कळताच स्थानिकांनी त्याला भररस्त्यात बेदम मारहाण केली.
हे ही वाचा: महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना तगडा धक्का, तेजस्वी घोसाळकरांनी साथ सोडली
आरोपीविरुद्ध तक्रार दाखल
या घटनेचा व्हिडीओ सुद्धा समोर आला असून संतापलेल्या लोक आरोपीला मारहाण करताना दिसत आहेत. त्यानंतर, पोलिसांना त्वरीत या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि घटनास्थळावरील संतप्त वातावरण नियंत्रणात आणलं. या प्रकरणासंदर्भात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.










