अमृता फडणवीस यांनी मेस्सीसोबत 3 वेळा घेतला सेल्फी, वानखेडेवर नेमकं काय घडलं? Video व्हायरल
Messi news : अमृता फडणवीस यांनी मेस्सीचा तीन वेळा घेतला सेल्फी, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मेस्सी भारत दौऱ्यावर
अमृता फडणवीसांनी घेतला तीन वेळा सेल्फी
Messi News : जागतिक पातळीवरील फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी हा देशात तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहे. त्याने नुकताच कोलकाता दौरा केला होता. पण, त्या कार्यक्रमाला कुठेतरी गालबोट लागल्याचं दिसून आलं. पण, मेस्सी 14 डिसेंबर रोजी देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आला. मेस्सीच्या येण्यानं क्रिकेटची पंढरी दुमदुमली होती. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मेस्सीसोबत सेल्फी घेतल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
हे ही वाचा : पुण्यात हुंडा प्रथा सुरुच, फॉर्च्युनरसह 55 तोळे सोने, विवाहितेवर सासऱ्याने विनयभंग केल्याचा आरोप
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, मेस्सी एका सेल्फीसाठी तब्बल 10 लाख रुपये आकारणार अशी एक चर्चा होती. अशातच आता अमृता फडणवीस यांनी मेस्सीसोबत तब्बल 3 सेल्फी घेतल्याचं व्हिडिओत दिसत आहे. त्या च्विंगम चघळताना दिसताहेत. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमृता फडणवीस यांनी मेस्सीसोबत तीन सेल्फी घेतल्याने त्यांनी मेस्सीला 30 लाख रुपये दिले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अमृता फडणवीसांनी तीन वेळा घेतला सेल्फी
व्हिडिओ पाहिल्यास कळते की, मेस्सी हा पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. त्याच्या भडक गुलाबी रंगाच्या कपड्यांमध्ये अमृता फडणवीस त्याला सेल्फी घेण्याबाबत विनवणी करत आहेत. तेव्हा अमृता फडणवीस सेल्फी घेतात. त्यानंतर त्या घटनास्थळावरून जाताना दिसतात, त्या च्विंगम चघळताना देखील दिसत आहेत. पुन्हा त्या मेस्सीजवळ येतात आणि त्यांनी पुन्हा दोन वेळा सेल्फी घेतल्याचं व्हिडिओतून दिसून आलं आहे.










