दोन वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या जालन्यातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी दयेची याचिका फेटाळली
Jalna News : ही शिक्षा जानेवारी 2016 मध्ये मुंबई उच्च न्यायालयानेही कायम ठेवली. त्यानंतर आरोपीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही त्याची याचिका फेटाळत 3 ऑक्टोबर 2019 रोजी फाशीची शिक्षा अंतिम ठरवली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दोन वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या जालन्यातील आरोपीला फाशीच
राष्ट्रपतींनी दयेची याचिका फेटाळली
नवी दिल्ली : महाराष्ट्रात 2012 साली घडलेल्या अत्यंत अमानुष घटनेतील दोषी आरोपीची दयेची याचिका राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी नामंजूर केली आहे. जालना येथील या प्रकरणात दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार व नंतर हत्या केल्याबद्दल आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुर्मू यांनी फेटाळलेली ही तिसरी दयेची याचिका ठरली आहे.
या प्रकरणातील आरोपी रवी अशोक घुमारे याने 8 मार्च 2012 रोजी जालना शहरातील इंदिरानगर परिसरात दोन वर्षांच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून पळवून नेले होते. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचे तपासात उघड झाले होते. या संतापजनक घटनेनंतर 16 सप्टेंबर 2015 रोजी स्थानिक सत्र न्यायालयाने घुमारे याला फाशीची शिक्षा सुनावली होती.
हेही वाचा : पुण्यात हुंडा प्रथा सुरुच, फॉर्च्युनरसह 55 तोळे सोने, विवाहितेवर सासऱ्याने विनयभंग केल्याचा आरोप
ही शिक्षा जानेवारी 2016 मध्ये मुंबई उच्च न्यायालयानेही कायम ठेवली. त्यानंतर आरोपीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही त्याची याचिका फेटाळत 3 ऑक्टोबर 2019 रोजी फाशीची शिक्षा अंतिम ठरवली होती.










