Beed: डिझेल टँकरचा National Highway वर स्फोट, स्फोटाचं नेमकं कारण आलं समोर!

मुंबई तक

बीडमधील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मांजरसुंबा घाटाजवळ एका डिझेल टँकरचा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये टँकरला भीषण आग लागली.

ADVERTISEMENT

beed diesel tanker explodes on national highway real reason for explosion revealed
Beed: डिझेल टँकरचा National Highway वर स्फोट
social share
google news

बीड: बीड जिल्ह्यातील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मांजरसुंबा घाटाजवळील कोळवाडी फाटा येथे आज (12 डिसेंबर) दुपारच्या सुमारास एका डिझेलच्या टँकरचा भीषण अपघात झाला. पूर्ण क्षमतेने भरलेला हा टँकर उलटल्याने त्याचा स्फोट होऊन आग लागली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात आगीचे प्रचंड लोट उठले. या घटनेमुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी जवळपास दोन ते अडीच किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नेमका कसा घडला अपघात 

टँकरला कंटेनरने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आणि त्यामुळेच आगीचा प्रचंड भडका झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, टँकर उलटताच त्यातून डिझेल गळू लागले आणि काही क्षणातच स्फोट होऊन आग भडकली. आगीने इतके रौद्ररूप धारण केले की, लगतच्या गायरान जमिनीवरील झाडे आणि वनस्पतींनाही या आगीचा फटका बसला आहे. परिसरातील हिरवीगार जागा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून, धुराचे लोट आकाशात पसरले आहेत.

हे ही वाचा>> पुण्यातील 'या' भागात पेट्रोल फक्त 86 रुपये लिटर, शरद पवारांच्या वाढदिनी खास उपक्रम, नागरिकांची तोबा गर्दी

ही घटना बीड लगतच्या पाली गावाजवळील कोळवाडी फाटा येथे घडली. मांजरसुंबा घाट हा डोंगराळ आणि वळणावळणाचा भाग असल्याने, येथे अपघाताची शक्यता नेहमीच असते. अपघातानंतर तात्काळ वाहतूक शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही बाजूच्या वाहनांना थांबवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. मात्र, आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला घटनास्थळी पोहोचण्यास उशीर लागला, ज्यामुळे आगीला आणखी फैलावण्याची संधी मिळाली.

डिझेलमुळे आग आटोक्यात आणण्यात मोठी अडचण येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. "डिझेलचा टँकर पूर्ण भरलेला असल्याने आग भडकण्यास वेळ लागला नाही. आम्ही प्रयत्न करत आहोत, पण डिझेलच्या गळतीमुळे आग नियंत्रणात आणणे कठीण जात आहे," असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत, मात्र डिझेलच्या स्वभावामुळे ही प्रक्रिया वेळखाऊ ठरत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp