बदलापूर : सर्पदंश करवून पत्नीचा खून, ब्रेन हॅमरेजचा बनाव, तीन वर्षांनंतर उलगडा; तिघांना अटक

मुंबई तक

Badlapur Crime News : पोलिस तपासानुसार, रूपेश आंबेरकर याने पत्नीचा काटा काढण्यासाठी पूर्वनियोजित कट रचला होता. या कटात त्याने आपल्या मित्रांची मदत घेतली. घटनेच्या दिवशी पत्नीच्या पायाला मालिश करून देण्याचा बहाणा करत त्याने कुणाल चौधरी, सर्पमित्र चेतन दुधाणे आणि हृषीकेश चाळके यांना आपल्या घरी बोलावले होते.

ADVERTISEMENT

Badlapur Crime News
Badlapur Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बदलापूर : सर्पदंश करवून पत्नीचा खून, ब्रेन हॅमरेजचा बनाव

point

तीन वर्षांनंतर उलगडा; तिघांना अटक

Badlapur Crime News : पत्नीचा मृत्यू मेंदूतील रक्तस्रावामुळे झाल्याचा बनाव तब्बल तीन वर्षे टिकवून ठेवणाऱ्या पतीचा धक्कादायक गुन्हा अखेर उघडकीस आला आहे. बदलापूर पोलिसांनी सखोल तपास करत पत्नीची हत्या सर्पदंशाच्या माध्यमातून करण्यात आल्याचा पर्दाफाश केला असून या प्रकरणात पतीसह त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

रूपेश आंबेरकर असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव असून त्याची पत्नी नीरजा आंबेरकर यांचा मृत्यू 10 जुलै 2022 रोजी बदलापूर पूर्वेतील एका निवासी इमारतीत झाला होता. त्या वेळी रूपेशने पत्नीचा मृत्यू अचानक ब्रेन हॅमरेजमुळे झाल्याचा दावा केला होता. त्यामुळे सुरुवातीला हा प्रकार नैसर्गिक मृत्यू म्हणून नोंदवण्यात आला होता. मात्र, आता पोलिस तपासातून समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे.

पोलिस तपासानुसार, रूपेश आंबेरकर याने पत्नीचा काटा काढण्यासाठी पूर्वनियोजित कट रचला होता. या कटात त्याने आपल्या मित्रांची मदत घेतली. घटनेच्या दिवशी पत्नीच्या पायाला मालिश करून देण्याचा बहाणा करत त्याने कुणाल चौधरी, सर्पमित्र चेतन दुधाणे आणि हृषीकेश चाळके यांना आपल्या घरी बोलावले होते. सर्व काही पूर्वनियोजनानुसार घडवून आणण्यात आले होते.

हेही वाचा : धक्कादायक... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावापासून जवळच सापडला 115 कोटींचा ड्रग्स साठा; क्राईम ब्रांचने 'असा' मारला छापा!

हे वाचलं का?

    follow whatsapp