मालेगाव: लेकीच्या 11 वर्षीय चार मैत्रिणींना बापानं दुसऱ्या मजल्यावर नेलं.. पीडित नातेवाईकाच्या गुप्तांगावर...

मुंबई तक

Washim Crime : राज्यातील वाशिमच्या मालेगाव शहरात एका 11 वर्षीय लहान मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचं वृत्त समोर आलं. या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबियांवर देखील आरोपीने प्राणघातक हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

Washim crime
Washim crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मालेगाव शहरात एका 11 वर्षीय लहान मुलीसोबत अश्लील चाळे

point

मुलीच्या नातेवाईकांवर गंभीर हल्ला 

Washim Crime : राज्यातील वाशिमच्या मालेगाव शहरात एका 11 वर्षीय लहान मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचं वृत्त समोर आलं. या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबियांवर देखील आरोपीने प्राणघातक हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्रकरणात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा : कराड हादरलं! भाच्याने भरचौकात मामावर चाकूने केले वार, हल्ल्यात मामाचा दुर्दैवी अंत

बापानं 11 वर्षीय मुलीच्या चार मैत्रिनींना दुसऱ्या मजल्यावर नेलं आणि..

मालेगाव शहरातील गांधीनगर परिसरात राहणाऱ्या गुणरत्न अरविंद पाखले यांनी आपल्याच 11 वर्षीय मुलीच्या चार मैत्रिनींना दुसऱ्या मजल्यावर नेलं आणि नंतर त्यांच्यासोबत लज्जास्पद कृत्य केलं. या घटनेनंतर चारही मुलींनी घडलेल्या घटनेचा सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला होता. तेव्हा पीडितेचे कुटुंबीयांनी आरोपीच्या घरी धाव घेतली होती. तेव्हा गुणरत्न पाखलेनं अचानक खिशात लपवलेल्या स्टीलच्या टोकदार कंपासने आणि टिनच्या एका लहान तुकड्याने हल्ला केला.

मुलीच्या नातेवाईकांवर गंभीर हल्ला 

या हल्ल्यातील तरुण आदित्य नाईकवाडे हा मुलीचा नातेवाईक, गंभीररित्या जखमी झाला होता. त्याच्या मानेवर आणि गुप्तांगातील भागांत आरोपीने हल्ला केला, तेव्हा त्याला खोलवर जखमी झाली होती. पीडित कुटुंबियांच्या तक्रारींवरून, मालेगाव पोलिसांनी आरोपी गुणरत्न पखाले विरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता (CRPC) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी त्याला एमसीआरमध्ये पाठवले.

हे ही वाचा : महाराष्ट्रातून लहान मुलं, मुली पळवल्या जातायत, राज ठाकरेंनी एनसीआरबी अहवालाचा दाखला देत फडणवीसांना सुनावलं..

याच प्रकरणात पोलीस अधिकारी पांडुरंग इंगळे यांनी सांगितलं की, " आरोपीवर पॉक्सो अंतर्गत (BNS) च्या भिन्न कलमांन्वये गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर करण्यात आले होते."

हे वाचलं का?

    follow whatsapp