चिखलदरा : दरीत चाललेली ट्रॅव्हरल अडवताना चालक चिरडला गेला, पण एका झाडामुळे 20 प्रवाशांचा जीव वाचला

मुंबई तक

Amaravati Accident : दरम्यान, सदर ट्रॅव्हलर सुमारे 20 फूट खोल दरीच्या दिशेने जाताना 10 फूट अंतरावर असलेल्या झाडाला अडकली. या दुर्घटनेत चालकाने स्वतःचा जीव गमावून प्रवाशांचे प्राण वाचविले.

ADVERTISEMENT

Amravai Accident
Amravai Accident
social share
google news

बातम्या हायलाइट

point

चिखलदरा : दरीत चाललेली ट्रॅव्हरल अडवताना चालक चिरडला गेला

point

पण एका झाडामुळे 20 प्रवाशांचा जीव वाचला

Amaravati Accident , चिखलदरा (अमरावती) : चंद्रपूरहून चिखलदऱ्याला फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या ट्रॅव्हलरमध्ये प्रवासादरम्यान एक महिला प्रवाशाला मळमळ सुरु झाली. त्यामुळे चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले. मात्र, हँडब्रेक पुरेशा प्रमाणात न लागल्याने घाटातील उतारावर वाहन अचानक पुढे सरकू लागले. हे लक्षात येताच चालकाने धावत जाऊन वाहन रोखण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने, त्याच प्रयत्नात तो वाहनाखाली सापडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, सदर ट्रॅव्हलर सुमारे 20 फूट खोल दरीच्या दिशेने जाताना 10 फूट अंतरावर असलेल्या झाडाला अडकली. या दुर्घटनेत चालकाने स्वतःचा जीव गमावून प्रवाशांचे प्राण वाचविले.

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे नाव सुमित वनकर (वय 34, रा. चंद्रपूर) असे आहे. विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा पर्यटनस्थळी चंद्रपूर येथून डीडी 03 टी 9048 क्रमांकाच्या ट्रॅव्हलरने महिला व पुरुष पर्यटक आले होते. रविवारी दुपारी परतीचा प्रवास सुरू असताना घाटातील वळणावर एका महिलेला अचानक मळमळ झाली आणि ओकारी येऊ लागल्याने चालकाने चिखलदरा–परतवाडा मार्गावरील आडनदी परिसरात वाहन थांबवले.

हेही वाचा : सातारा ड्रग्स प्रकरण: शिंदेच्या शिवसेनेतील 'त्या' नेत्यावर काँग्रेसकडून संशय, खळबळ उडवून देणारं नेमकं प्रकरण काय?

थांबविल्यानंतर काही क्षणातच उताराच्या दिशेने वाहन हळूहळू पुढे सरकत असल्याचे सुमीतच्या लक्षात आले. तत्काळ धोका ओळखून त्याने धावत जाऊन वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या झटापटीत त्याचा पाय चाकाखाली आल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला आणि जागीच कोसळला. त्याच वेळी ट्रॅव्हलर दरीकडे झेपावत दोन झाडांच्या मधून जात तिसऱ्या झाडाला अडकली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि वाहनातील सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर पडले.

हे वाचलं का?

    follow whatsapp