भावाचा मृतदेह नेत असलेल्या बहिणीचा समृद्धी महामार्गावर अपघाती मृत्यू, छत्रपती संभाजीनगरमधील घटना

मुंबई तक

Samruddhi mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव वेगात धावणाऱ्या रुग्णवाहिकेचा ट्रकला मागून जोरदार धक्का बसून झालेल्या भीषण अपघातात बहिणीचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा पती गंभीर जखमी झाला. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घडली.

ADVERTISEMENT

Samruddhi mahamarg Accident
Samruddhi mahamarg Accident
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भावाचा मृतदेह नेत असलेल्या बहिणीचा समृद्धी महामार्गावर अपघाती मृत्यू

point

छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Samruddhi mahamarg Accident, वैजापूर : भावाच्या मृत्यूनंतर शोकाकुल मनाने त्याचा पार्थिव घेऊन मूळ गावी निघालेल्या बहिणीच्या आयुष्यावर काळाने घाला घातला. समृद्धी महामार्गावर भरधाव वेगात धावणाऱ्या रुग्णवाहिकेचा ट्रकला मागून जोरदार धक्का बसून झालेल्या भीषण अपघातात बहिणीचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा पती गंभीर जखमी झाला. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सुमारे एक वाजण्याच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील जांबरगाव शिवारात घडली.

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव सावित्रीदेवी भागवती प्रसाद यादव (वय 49, रा. मुंबई) असे आहे. त्या मूळच्या उत्तर प्रदेशातील असून सध्या कुटुंबासह मुंबईत वास्तव्यास होत्या. सावित्रीदेवी यांचे भाऊ लालजी यादव (वय 65) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. भावाच्या निधनामुळे कुटुंबावर शोककळा पसरली होती. अंत्यसंस्कारासाठी त्यांचा मृतदेह मुंबईहून उत्तर प्रदेशातील मूळ गावी नेण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला.

रुग्णवाहिकेतून मृतदेहासह कुटुंबातील चार सदस्य आणि चालक असा प्रवास सुरू होता. मुंबईहून निघालेली रुग्णवाहिका समृद्धी महामार्गावरून वेगात जात होती. जांबरगाव शिवाराजवळ रुग्णवाहिकेने समोर चाललेल्या ट्रकला मागून जोराची धडक दिली. ट्रक आणि रुग्णवाहिकेची धडक इतकी जोरात होती की, वाहनाच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.

हेही वाचा : चिखलदरा : दरीत चाललेली ट्रॅव्हरल अडवताना चालक चिरडला गेला, पण एका झाडामुळे 20 प्रवाशांचा जीव वाचला

हे वाचलं का?

    follow whatsapp