सोलापूर : पन्नास हजारांची लाच घेताना नायब तहसीलदाराला रंगेहात पडकलं, घरातही 60 हजार सापडले

मुंबई तक

Solapur Crime : तक्रारदाराने 5 डिसेंबर रोजी पुण्यातील ACB कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर विभागाने नियोजनबद्ध सापळा रचला. सोमवारी सायंकाळी ठरलेल्या ठिकाणी तक्रारदाराकडून 40,000 रुपये स्वीकारताच ACB पथकाने चंद्रकांत हेडगिरे याला रंगेहाथ ताब्यात घेतले. कारवाईनंतर तहसील कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली.

ADVERTISEMENT

Solapur Crime
Solapur Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोलापूर : पन्नास हजारांची लाच घेताना नायब तहसीलदाराला रंगेहात पडकलं,

point

घरातही 60 हजार सापडले, संपूर्ण जिल्ह्यात खळबळ

Solapur Crime, सोलापूर : शासकीय कर्मचाऱ्याचे प्रलंबित वेतन काढून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा प्रकार उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात उघडकीस आला आहे. मंडळ अधिकाऱ्याचे थकलेले वेतन मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात 60,000 रुपयांची मागणी करून त्यापैकी 40,000 रुपये स्वीकारताना नायब तहसीलदार चंद्रकांत काशीनाथ हेडगिरे (वय 52) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सोमवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. ही कारवाई सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे महसूल विभागातील मंडळ अधिकारी असून त्यांचे वेतन काही काळापासून प्रलंबित होते. नियमानुसार वेतन काढण्यासाठी त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केला होता. मात्र, कामकाज पुढे सरकत नसल्याने त्यांनी पाठपुरावा सुरू केला. याचदरम्यान तहसील कार्यालयातील संबंधित नायब तहसीलदाराने वेतन मंजुरीसाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला 60,000 रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती. लाच देण्यास इच्छुक नसल्याने तक्रारदाराने या प्रकाराबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला.

तक्रारदाराने 5 डिसेंबर रोजी पुण्यातील ACB कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर विभागाने नियोजनबद्ध सापळा रचला. सोमवारी सायंकाळी ठरलेल्या ठिकाणी तक्रारदाराकडून 40,000 रुपये स्वीकारताच ACB पथकाने चंद्रकांत हेडगिरे याला रंगेहाथ ताब्यात घेतले. कारवाईनंतर तहसील कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली.

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांचं विचित्र कृत्य, भर कार्यक्रमात नितीश कुमारांनी महिला डॉक्टरचा हिजाबच खेचला अन्…

हे वाचलं का?

    follow whatsapp