गडचिरोली: वेतन वाढीसाठी शारीरिक सुखाची मागणी, डॉक्टरांचा नर्सला 'तो' मॅसेज अन्... आरोपीच्या निलंबनाचे आदेश!

मुंबई तक

गडचिरोलीत आरोग्य अधिकाऱ्यांनी कंत्राटी परिचारिकडे शारीरिक सुखाची मागणी केल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. या प्रकरणी आरोपीवर कारवाई करत त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

ADVERTISEMENT

डॉक्टरांचा नर्सला 'तो' मॅसेज अन्...
डॉक्टरांचा नर्सला 'तो' मॅसेज अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आरोग्य अधिकाऱ्याची नर्सकडे शारीरिक सुखाची मागणी

point

आरोपी डॉक्टरच्या निलंबनाचे आदेश

Gadchiroli Crime: गडचिरोलीच्या मुलचेरा येथे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी कंत्राटी परिचारिकडे शारीरिक सुखाची मागणी केल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. आरोपी अधिकाऱ्यांचं नाव डॉ. विनोद म्हशाखेत्री असून त्यांनी पीडितेची वेतन वाढ रोखल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. आता, या प्रकरणी आरोपीवर कारवाई करत त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 

नेमकं प्रकरण काय?   

आरोपी डॉ. विनोद म्हशाखेत्री यांनी 45 वर्षीय पीडित परिचारिकेची वेतन वाढ रोखून तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. इतकेच नव्हे तर, या त्रासाला कंटाळून पीडितेने विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा केला होता. पीडित महिला गेल्या दोन वर्षांपासून पीडितेची वेतनवाढ थांबवण्यात आली होती आणि त्यामुळे परिचारिका तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना व्हॉट्सअॅप मॅसेजवरून संपर्क करायच्या. मात्र, त्यावेळी तालुका अधिकाऱ्यांनी पीडितेला मॅसेज करून तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. यामुळे, पीडिता मानसिक तणावात होती. 

हे ही वाचा: "तू काळी आहेस, अपशकुनी आहेस..." सासरी हुंड्यासाठी छळ अन् रंगावरून टोमणे! विवाहितेचे गंभीर आरोप...

आरोपी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश 

संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने पीडितेवर घृणास्पद दबाव टाकल्याचा थेट आरोप परिचारिकेच्या पतीने केला असून संबंधित तालुका आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी पीडितेच्या पतीने केली आहे. पीडित परिचारिकेच्या जबाबावरून पोलिसांनी या गंभीर गुन्ह्याची नोंद केली होती. शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने याची दखल घेत डॉ. विनोद म्हशाखेत्री यांना तात्काळ निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून निलंबन काळात डॉ. विनोद म्हशाखेत्री यांचे मुख्यालय जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, गोंदिया येथे निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती गडचिरोली (Gadchiroli) जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांनी दिली आहे. 

हे ही वाचा: वाशिम: खोटं लग्न अन् फसवणूक... नवरी पळून जाण्याच्या तयारीत पण, अचानक भलत्याच गाडीवर हल्ला, नंतर घडलं भयानक!

डॉ. प्रताप शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणासंदर्भातील FIR आणि चौकशी अहवालांची प्रत शासनाकडे पाठवण्यात आली होती. आता, शासनस्तरावर याची तत्काळ दखल घेऊन, संबंधित तालुका आरोग्य अधिकारी डॉ विनोद म्हशाखेत्रीला तत्काळ निलंबित करण्यात आलं आहे. त्यांची विभागीय चौकशी करण्यात येत असल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp