"तू काळी आहेस, अपशकुनी आहेस..." सासरी हुंड्यासाठी छळ अन् रंगावरून टोमणे! विवाहितेचे गंभीर आरोप...

मुंबई तक

एका विवाहित महिलेचा हुंड्यासाठी छळ आणि तिला तिच्या रंगावरून हिणवण्यात आल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

सासरी हुंड्यासाठी छळ अन्...
सासरी हुंड्यासाठी छळ अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

"तू काळी आहेस, अपशकुनी आहेस..." सासरी महिलेला टोमणे...

point

हुंड्यासाठी पीडितेचा शारीरिक आणि मानसिक छळ

Crime News: आंध्र प्रदेशातील पलनाडु जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका विवाहित महिलेचा हुंड्यासाठी छळ आणि तिला तिच्या रंगावरून हिणवण्यात आल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पीडितेचं नाव गोपी लक्ष्मी असून ती विनुकोंडा येथील नादिगड्डा गावाची रहिवासी आहे. पीडितेने केलेल्या आरोपानुसार, लग्न झाल्याच्या काही माहिन्यांनंतर, तिच्यावर तिच्या पती आणि सासरच्या लोकांकडून मानसिक आणि शारीरिक छळ केला जायचा. इतकेच नव्हे तर, सासरी महिलेला तिच्या रंगावरून हिणवलं जात होतं आणि तिच्यामुळेच घरात अशुभ घडत असल्याचं तिला सांगितलं जायचं. 

हुंड्यासाठी पीडितेचा छळ 

या वर्षी 4 जून रोजी गोपी लक्ष्मीचं विनुकोंडा शहरातील रहिवासी असलेल्या कोटेश्वर राव याच्यासोबत लग्न झालं होतं. पीडितेच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या जवळपास दोन महिन्यांनंतर तिचा पती कोटेश्वर राव, मावशी शेषम्मा आणि मामा वेंकटेश्वरलू यांनी तिचा छळ करण्यास सुरूवात केली. ती म्हणाली, की तिच्या सासरच्या लोकांनी तिच्या माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार दबाव आणला. 

रंगावरून सतत हिणवलं जायचं... 

पीडितेने तक्रारीत सांगितलं की, लग्नाच्या वेळी तिच्या आई-वडिलांनी त्यांची दोन एकर जमीन गहाण ठेवली होती आणि तिच्या लग्नात 12 लाख रुपये रोख आणि 25 तोळे सोने हुंडा दिला होता. लक्ष्मीच्या कुटुंबियांना श्रीमंत कुटुंबात मुलीच्या आनंदी जीवनाची आशा होती, परंतु तसं काही झालं नाही. लक्ष्मीने आरोप केला की तिचा पती तिच्या काळ्या रंगावरून तिचा अपमान करत होता, ती काळी असल्याने त्याला ती आवडत नव्हती. इतकेच नव्हे तर, तिच्या सासरचे लोक ती घरात आल्यापासून कुटुंबात अशुभ घटना घडत असल्याचं सतत म्हणत होते. 

हे ही वाचा: वाशिम: खोटं लग्न अन् फसवणूक... नवरी पळून जाण्याच्या तयारीत पण, अचानक भलत्याच गाडीवर हल्ला, नंतर घडलं भयानक!

पीडितेने आरोप केला की तिच्या सासरच्या लोकांनी तिला राजकीय ओळखींबद्दल सांगून धमकावलं. ते आपल्या सुनेला म्हणाले की, जरी तिने पोलिसांकडे तक्रार केली तरी त्यातून काहीच होणार नाही. 

हे वाचलं का?

    follow whatsapp