Maharashtra Weather : राज्यात धुक्यासह थंडीनं हुडहुडी भरणार, 'या' भागातील जिल्ह्यांना थंडीचा अलर्ट

मुंबई तक

Maharashtra Weather : भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, राज्यात उद्या 17 डिसेंबर रोजी मुख्यतः स्वच्छ आकाश आणि कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

maharashtra weather
maharashtra weather
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार...

point

17 डिसेंबर रोजी मुख्यतः स्वच्छ आकाश आणि कोरडे हवामान

Maharashtra Weather : भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, राज्यात उद्या 17 डिसेंबर रोजी मुख्यतः स्वच्छ आकाश आणि कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या सर्व उपविभागांमध्ये - कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या सर्वच विभागांमध्ये धुके राहण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : पुण्यातील 'या' भागात सुरु होतं सेक्स रॅकेट, पोलिसांनी चक्र फिरवली अन् झाला पर्दाफाश, असा घेतला शोध

कोकण विभाग :

कोकण विभागात डिसेंबर महिन्यात हवामान थंड राहिल असा हवामानाचा अलर्ट आहे. अशातच 17 डिसेंबर रोजी ठाणे, मुंबई, पालघरमध्ये थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच वातावरण कोरडं राहण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी दाट धुके दिसणार आहेत.

मध्य महाराष्ट्र विभाग :

मध्य महाराष्ट्रातील पुणे शहरात सकाळी धुके राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने रात्री थंडी जाणवेल. तसेच तापमान हे कोरडं राहण्याची शक्यता आहे.

मराठवाडा विभाग :

तसेच मराठवाडा विभागात कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. तापमानात काही प्रमाणात फरक जाणवू शकतो. रात्री थंडीपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp