Govt Job: एअरपोर्टवर नोकरी हवीये? मग, या भरतीसाठी आत्ताच करा अप्लाय! पगार तर...

मुंबई तक

एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया (AAI) कडून सीनिअर असिस्टंट आणि जुनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

एअरपोर्टवर नोकरी मिळवण्याची संधी...
एअरपोर्टवर नोकरी मिळवण्याची संधी...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया'कडून नवी भरती

point

कधीपर्यंत करू शकता अर्ज?

AAI Recruitment 2025: एअरपोर्टवर नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या तरुणांसाठी चांगली बातमी समोर आली आहे. एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया (AAI) कडून सीनिअर असिस्टंट आणि जुनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 12 डिसेंबर 2025 पासून सुरू झाली असून उमेदवार  www.aai.aero या अधिकृत वेबसाइटवर जाऊन 11 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. 

शैक्षणिक पात्रता

सीनिअर असिस्टंट पदासाठी अप्लाय करण्यासाठी उमेदवारांकडे इलेट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन/ रेडिओ इंजीनियरिंग क्षेत्रात 2 वर्षांचा डिप्लोमा आणि संबंधित क्षेत्रात 2 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसेच, जुनिअर असिस्टंट (HR) साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे ग्रॅज्युएशन (पदवी) असणं गरजेचं आहे. जुनिअर असिस्टंट (फायर सर्व्हिसेस) पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने 10 वी उत्तीर्ण असण्यासोबत 3 वर्षांचा मैकेनिकल/ ऑटोमोबाइल/ फायर क्षेत्रात रेग्युलर डिप्लोमा आणि रेग्युलर स्टडीमध्ये 12 वी पास असणं अनिवार्य आहे. 

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी लेखी परीक्षा आणि डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. तसेच, जुनिअर असिस्टंट पदासाठी कंप्यूटर लिटरसी (संगणक साक्षरता) टेस्ट सुद्धा घेतली जाईल. 

हे ही वाचा: फोन कॉलवर ओळख अन् नंतर व्हिडीओ कॉलवर अश्लील बोलणं! पण, शेवटी अनपेक्षित घडलं अन्... नेमकं प्रकरण काय?

कसा कराल अर्ज? 

1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे व्हॅलिड पर्सनल ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे. 
2. या माध्यमातून यूजर आयडी, पासवर्ड आणि इतर महत्त्वाची माहिती पाठवली जाईल. 
3. भरतीसाठी सर्वप्रथम www.aai.aero या अधिकृत वेबसाइटवर जा. 
4. त्यानंतर, sign-up च्या टॅबवर पोस्ट अपायड, उमेदवाराचं नाव, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर अशी महत्त्वपूर्ण माहिती भरा. 
5. आता Log Out च्या टॅबवर जाऊन आपल्या रजिस्टर्ड नंबरच्या माध्यमातून लॉगिन करा. 
6. नंतर, अर्ज करण्यास सुरूवात करा. माहिती भरल्यानंतर दिलेल्या साइझमध्ये पासपोर्ट फोटो आणि सही अपलोड करा. 
7. याव्यतिरिक्त, 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण मार्कशीट, जातीचा दाखला, ड्रायव्हिंग लायसन्स असे डॉक्यूमेंट्स स्कॅन करून अपलोड करा. 
8. शेवटी, फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंटआउट काढा आणि सुरक्षितरित्या ठेवा. 

हे वाचलं का?

    follow whatsapp