सांगली: अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांकडून अत्याचार; मुलीला विवस्त्रच दिलं सोडून अन्...
sangli crime : सांगली जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका अल्पवयीन मुलीवर दोन्ही गुडांनी एका उसाच्या शेतात नेलं आणि लैंगिक अत्याचार केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सांगली अल्पवयीन मुलीवर उसाच्या शेतात लैंगिक शोषण
पीडिता एक किमी अंतरावर विवस्त्रच आली
Sangli Crime : सांगली जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका अल्पवयीन मुलीवर दोन्ही गुडांनी एका उसाच्या शेतात नेलं आणि लैंगिक अत्याचार केला. या मन हेलावणाऱ्या घटनेनंतर नराधम पीडितेचे कपडे कपडे काढून घेतले. त्यानंतर पीडित मुलगी ही घटनास्थळावरून चालत गावात आली. ही घटना वालवा तालुक्यात 16 डिसेंबर रोजी रात्री 8:30 वाजता घडली होती.
हे ही वाचा : ज्योतिषशास्त्रानुसार 'या' राशीतील लोकांचे प्रेमसंबंध मजबूत होतील, तर काहींवर पडणार पैशांचा पाऊस
नेमकं काय घडलं?
असे हैवानी कृत्य करणाऱ्या दोघांना इश्वरपूर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेत असलेल्यांची नावे आता समोर आली आहेत. आशिष जयवंत खांबे (वय 26) आणि ऋतिक दिनकर महापुरे (वय 27) अशी त्यांची नावे आहेत. घडलेल्या घटनेनुसार, इश्वरपूरातील पेठ सांगली रोडवर एका रुग्णालयामागील असलेल्या एका उसाच्या शेतात नेले आणि मुलीचं लैंगिक शोषण केलं. तसेच तिला बेल्टच्या आधारे बेदम मारहाण देखील केली होती. नंतर तिला जीवे मारण्याची देखील धमकी देण्यात आली होती.
पीडिता एक किमी अंतरावर विवस्त्रच आली
मारहाणीनंतर मुलीचे कपडे काढले आणि आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. त्यानंतर पीडित ही गावापर्यंत एक किमी अंतरापर्यंत चालत आली होती. नंतर काही लोकांना पीडितेला कपडे दिले होते. तेव्हा तिनं घर गाठून आपल्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि नंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
हे ही वाचा : ट्रेनचं शौचालय झालं OYO हॉटेल, दरवाजा बंद करून जोडपं मजा मारत होतं, 'तसले' क्षण कॅमेऱ्यात कैद
या प्रकरणात पोलिसांनी आरोपींवर भारतीय न्यायसंहिता तसेच पोक्सो कायद्यांतर्गत कठोर कलमे लावण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास हा सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करत आहेत.










