सिलेंडरचं रेग्युलेटर खाली पडलं, आवाजाने उठलेल्या वृद्धेच्या गुप्तांगावर वार अन्…
Dhule Crime : गॅस सिलेंडरचे रेग्युलेटर काढताना झालेल्या आवाजामुळे वृद्ध महिला जाग्या झाल्या. त्यांनी प्रतिकार केल्याने आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला. स्टीलच्या खुरपीसारख्या कठोर वस्तूने गुप्तांगावर वार करून त्याने त्यांची हत्या केल्याचे त्याने मान्य केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
धुळे : सिलेंडरचं रेग्युलेटर खाली पडलं
आवाजाने उठलेल्या वृद्धेला गुप्तांगावर वार करुन संपवलं
कसा झाला उलगडा?
Dhule Crime : धुळे जिल्ह्यातील मोहाडी उपनगरात घडलेल्या एका निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला होता. सोमवारी, 15 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास एका वृद्ध महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह तिच्याच घरात आढळून आला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र घटनास्थळी सापडलेल्या एका छोट्या धाग्याच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासांत आरोपीला अटक करून या खुनाचा छडा लावला आहे.
मोहाडी येथील दंडवाले बाबा नगर परिसरातील वाल्मिकी आंबेडकर वसाहतीत राहणाऱ्या 75 वर्षीय लीलाबाई हिरामण सूर्यवंशी या एकट्याच राहत होत्या. पहाटे त्यांच्या घरातून रक्त बाहेर आल्याची माहिती शेजाऱ्यांना मिळताच त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता लीलाबाई यांचा मृतदेह घरातच आढळून आला. प्राथमिक तपासात अज्ञात व्यक्तीने चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश करून वृद्धेवर अमानुष हल्ला केल्याचे स्पष्ट झाले. घरातील काही साहित्य, स्वयंपाकघरातील डबे आणि गॅस सिलेंडर गायब असल्याचेही निदर्शनास आले.
हेही वाचा : पुणे : एकतर्फी प्रेमातून कबड्डीपटू तरुणीला कोयता अन् चाकूने 22 वार करुन संपवलं, आरोपीला जन्मठेप
या प्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके तयार करून तपासाला गती देण्यात आली. तपासादरम्यान घटनास्थळी एक मनगटी घड्याळ सापडले. हे घड्याळ तपासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. त्याचा फोटो परिसरातील गोपनीय बातमीदारांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवण्यात आला.










