महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार! मित्राने अश्लील व्हिडीओ शूट केले अन्...
पीडितेच्या ओळखीच्या एका तरुणाने त्याच्या मित्रांसोबत मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार!
मित्राने अश्लील व्हिडीओ शूट केले अन्...
Crime News: एका महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित घटना ही कर्नाटकच्या बंगळुरू येथील मागडी परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेच्या ओळखीच्या एका तरुणाने त्याच्या मित्रांसोबत मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर, पोलिसांनी आरोपींविरोधात त्वरीत कारवाई करत तिघांना ताब्यात घेतलं आहे. काही महिन्यांपासूनच, आरोपी पीडितेला ओळखत असल्याची माहिती आहे.
प्रेमाचं नाटक करून शारीरिक संबंध ठेवले अन्...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी जवळपास 6 ते 7 महिन्यांपूर्वी आरोपीच्या संपर्कात आली होती. प्रकरणातील मुख्य आरोपी हा कॉलेजचा विद्यार्थी असून तो ह्यूमॅनिटेरिअन सायन्सचं शिक्षण घेत असल्याचं पीडितेनं सांगितलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी पीडितेसोबत प्रेमाचं नाटक करून तिला आपल्या मित्राच्या घरी सतत घेऊन जायचा आणि त्या काळात तिच्यासोबत बऱ्याचदा शारीरिक संबंध ठेवण्यात आले. दरम्यान, दुसऱ्या आरोपीने पीडितेचे अश्लील व्हिडीओ सुद्धा बनवले. त्यानंतर, त्याने ते व्हिडीओ त्याच्या दोन्ही मित्रांना पाठवले आणि तिघांनी मिळून त्या अश्लील व्हिडीओच्या आधारे तरुणीला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली.
हे ही वाचा: छत्रपती संभाजीनगर: मित्राने बोलवल्यावर लॉजवर गेली, पण दारूच्या नशेत भलत्याच रूममध्ये शिरली अन् विवाहितेवर लैंगिक अत्याचार!
आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल
पोलिसांनी या प्रकरणाबद्दल सांगितलं की, आरोपींनी विद्यार्थिनीला धमकी दिली होती की, कधीही आणि कुठेही बोलावल्यानंतर तिथे तिला यावं लागेल. अखेर, सततच्या ब्लॅकमेलिंग आणि छळाला कंटाळून पीडितेने बुधवारी मागडी पोलिस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि तिन्ही आरोपींना अटक केली.
हे ही वाचा: फक्त एक SMS अन् पुण्यातील आर्मी कर्नलसोबत होत्याचं नव्हतं झालं... नेमकं काय घडलं?
पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना म्हटलं की, "या घटनेतील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी दोघे महाविद्यालयीन विद्यार्थी असून एक नोकरी करत होता. हे तिघेही पीडितेचे मित्र होते आणि काही महिन्यांपासून ते एकमेकांना ओळखत होते. मुख्य आरोपी हा महाविद्यालयात ह्यूमॅनिटेरिअन सायन्सचं शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे." पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.










