तुमच्या मोबाइलमधील 'हे' 14 अॅप्स ठरतील धोक्याचे, 'ही' घटना टाकेल तुम्हाला हादरवून!
क्राइम ब्रांचने एका हाय-प्रोफाइल ऑनलाइन सायबर फसवणूकीच्या प्रकरणात आठ जणांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तुमच्या मोबाईलमधील 'हे' 14 अॅप्स ठरतील धोक्याचे...
यातूनच CA ची तब्बल 47 लाख रुपयांची फसवणूक!
Cyber Crime: दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने एका मोठ्या सायबर सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. क्राइम ब्रांचने एका हाय-प्रोफाइल ऑनलाइन सायबर फसवणूकीच्या प्रकरणात आठ जणांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी एक, जॅक उर्फ आशिष कुमार हा बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील रहिवासी असून त्याने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून दिल्लीतील एका चार्टर्ड अकाउंटंटची 47 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी नोएडामध्ये एक बनावट ऑफिस उघडलं होतं आणि तिथूनच ते लोकांची लाखो रुपयांची फसवणूक करत होती. जॅक उर्फ आशिष कुमारला थेट चीनमधील 'टॉम' कडून सूचना देण्यात आल्या होत्या. टॉमने या प्रकरणातील आरोपींना प्रत्येक ट्रान्झेक्शनवर 1 ते 1.5 टक्के कमिशनचं आमिष दाखवलं होतं.
दररोज नफा मिळवून देण्याचं आश्वासन
दिल्लीतील एका चार्टर्ड अकाउंटंट (CA)ने टेलिग्राम ग्रुपद्वारे स्टॉक ट्रेडिंग स्कीममध्ये 47 लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली होती. सायबर फसवणूक करणाऱ्यांनी त्याला "आज खरेदी करा, उद्या विक्री करा" आणि आयपीओ रेटिंगद्वारे दररोज नफा मिळवून देण्याचं आश्वासन देऊन आमिष दाखवलं. https://stock.durocaspitall.com नावाच्या बनावट वेबसाइटद्वारे पीडित तरुणाला दोन महिन्यांत 47,23,015 रुपये गुंतवण्यास प्रवृत्त करण्यात आलं. त्यानंतर, IMPS/NEFT/UPI द्वारे बऱ्याच प्रायव्हेट बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यात आले. मात्र, जेव्हा पीडित तरुणाने त्याचे पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने त्याला धमकावलं. एवढंच नाही तर त्याच्याकडून अधिक पैसे उकळण्यात आले.
पोलिसांच्या तपासात समोर आलं की, हर्षिता फर्निचर अँड इंटिरियर्सच्या नावाने उघडलेल्या चालू खात्यात त्यापैकी 31,45,000 रुपये गुंतवण्यात आले आणि फसवणूक केलेल्या या रकमेपैकी 23,80,000 रुपये (31.45 लाखांपैकी) बुबाई इन्स्टंट शॉप ओपीसी प्रायव्हेट लिमिटेडच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली होती. या फर्मचा मालक साहिल यादव असून रजिस्टर्ड मोबाइल नंबर आर्यनच्या नावावर होता. त्याला आधीच अटक करण्यात आली आहे. हे बँक खातं बनावट संस्थेच्या नावाने वापरण्यात आलं होतं.
'या' बँकेत गुंतवले पैसे
आरोपींनी इंडसइंड, एचडीएफसी, येस बँक, आयडीएफसी फर्स्ट, एयू स्मॉल फायनान्स, बंधन आणि इक्विटास बँक या सात वेगवेगळ्या बँकांमध्ये चालू खाती उघडून फसवणुकीचे पैसे लाँडर केले. तपासात या फर्मच्या खात्याशी संबंधित 131 एनसीआरपी तक्रारी देखील उघड झाल्या. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात मनजीत सिंग, मनश्वी दोचक, सोमबीर, मनीष मेहरा आणि अतुल शर्मा यांना अटक केली आहे. अटक केलेले सर्व जण हरियाणाचे रहिवासी आहेत.
हे ही वाचा: प्रेयसीचे भलत्याच तरुणासोबत प्रेमसंबंध! प्रियकराला भनक लागली अन्... तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भयंकर कृत्य!
चौकशीदरम्यान, आरोपींनी सांगितलं की त्यांना डिसेंबर 2024 मध्ये एका चिनी नागरिक टॉमने टेलिग्रामद्वारे भरती केले होते. टॉमने प्रत्येक व्यवहारावर 1-1.5 टक्के कमिशन देण्याचं आश्वासन दिलं होतं, म्हणून त्यांनी बुबाई इन्स्टंट शॉप ओपीसी प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. नोएडामध्ये एक कार्यालय भाड्याने घेतलं आणि त्याच नावाने अनेक बँक खाती उघडली.










