लातूर हादरलं! तलावात आढळला पुरुषासह महिलेचा मृतदेह, तीन दिवसांपासून बेपत्ता अन् अचानक...

मुंबई तक

लातूरच्या नळेगाव येथील एका तलावात महिला आणि पुरुषाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

तलावात आढळला पुरुषासह महिलेचा मृतदेह
तलावात आढळला पुरुषासह महिलेचा मृतदेह
social share
google news

बातम्या हायलाइट

point

तलावात आढळला पुरुषासह महिलेचा मृतदेह

point

लातूरमधील धक्कादायक घटना

Latur Crime: लातूर जिल्ह्यातील एका गावात धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. येथे एका तलावात महिला आणि पुरुषाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी चाकूर तहसीलमधील नळेगाव गावातील ही घटना आहे. येथील घरणी नदीवरील एका पुलाजवळ तलावात तरंगणारे दोन्ही मृतदेह आढळले. 

मृतांची ओळख समोर... 

अनीता लक्ष्मण तेलंगे आणि राजकुमार श्रंगारे अशी मृतांची ओळख समोर आली आहे. दोघेही मूळचे नळेगाव गावातील रहिवासी होते, अशी स्थानिकांची माहिती आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अनीता लक्ष्मण तेलंगे ही रोजंदारीवर मजूर म्हणून कार्यरत होती, तसेच राजकुमार श्रंगारे हा चाकूर तहसीलमधील अष्टमोडे गावाचा रहिवासी होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही विवाहित असून वेगवेगळ्या कुटुंबात त्यांचं लग्न झालं होतं. अशातच, दोघांचे एकत्र मृतदेह सापडल्यामुळे गावकऱ्यांमध्ये बऱ्याच चर्चा रंगत आहेत. या घटनेमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत आहेत. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: प्रतिक्षा संपली! कर्जत-पनवेल लोकलसाठी नवा मार्ग, 300 मीटरच्या बोगद्याचं काम पूर्ण

तीन दिवसांपासून बेपत्ता 

वृत्तानुसार, सोमवारी (15 डिसेंबर) सकाळी गावकऱ्यांना दोघांचे मृतदेह तरंगताना दिसले. त्यानंतर, लगेच पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर, मृतांची ओळख पटवण्यात आली. पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, अनीता तेलंगेसंदर्भात 12 डिसेंबर रोजी चाकूर पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली. तसेच, राजकुमार श्रंगारे हा मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याचं सांगितलं जात होतं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp