"मी तुला विकणार आहे..." मित्रांमध्ये पत्नीचे अश्लील फोटो केले व्हायरल अन्... पीडितेने दाखल केली तक्रार!
एका महिलेने आपल्याच पतीवर गंभीर आरोप केले आहेत. पीडितेने पोलिसात तक्रार करताना सांगितलं की, तिच्या पतीने तिचे अश्लील फोटो आपल्या मित्रांमध्ये व्हायरल केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पतीने त्याच्या मित्रांमध्ये पत्नीचे अश्लील फोटो केले व्हायरल
पीडितेने पतीविरुद्ध दाखल केली तक्रार!
Crime News: उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथून धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका महिलेने आपल्याच पतीवर गंभीर आरोप केले आहेत. पीडितेने पोलिसात तक्रार करताना सांगितलं की, तिच्या पतीने तिचे अश्लील फोटो आपल्या मित्रांमध्ये व्हायरल केले. त्यानंतर, महिलेने तिच्या पतीला त्याच्या या घाणेरड्या कृत्याचा जाब विचारला असता तिला बळजबरीने दारू पाजण्यात आली. इतकेच नव्हे तर, पीडितेला विकून टाकणार असल्याचं त्याने पत्नीला सांगितलं. या प्रकरणासंदर्भात, पीडित पत्नीने आपल्या पतीविरुद्ध करीमुद्दीनपुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
पत्नीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल...
करीमुद्दीनपुर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात राहणाऱ्या महिलेचं 3 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. लग्नानंतर, जवळपास अडीच वर्षे सगळं काही ठिक होतं. मात्र, त्यानंतर त्या दोघांमध्ये वाद सुरू झाले. पीडित महिलेने केलेल्या आरोपानुसार, आरोपी पतीने तिचे काही अश्लील फोटो काढले आणि ते त्याच्या मित्रांना पाठवले. एवढंच नाही तर, त्याने पीडितेचा एका व्हिडीओ सुद्धा व्हायरल केला.
पीडितेला पतीकडून बेदम मारहाण
पतीने आपले अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केल्याचं पीडितेला कळालं आणि तिने आरोपी पतीला त्याच्या कृत्याचा जाब विचारला. त्यावेळी, आरोपीने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली आणि नंतर, जळजबरीने तिला दारू पाजली. इतकेच नव्हे तर, आरोपी त्याच्या पत्नीला म्हणाला की "मी तुला विकणार आहे आणि म्हणून मी तुझा आक्षेपार्ह व्हिडीओ काढला."
हे ही वाचा: गडचिरोली: वेतन वाढीसाठी शारीरिक सुखाची मागणी, डॉक्टरांचा नर्सला 'तो' मॅसेज अन्... आरोपीच्या निलंबनाचे आदेश!
पत्नीने दाखल केली तक्रार
सध्या, पीडिता 5 महिन्यांची गर्भवती असून देखील तिचा पती तिला बेदम मारहाण करतो. पती सतत मारहाण करत असल्यामुळे पीडिता वैतागून तिच्या बहिणीच्या घरी राहत आहे. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, तिने तिच्या पतीविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. मात्र, पोलिसांनी यावर काहीच अॅक्शन घेतली नाही. त्यानंतर, तिने वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रारपत्र देत म्हणाली की, "जर मला न्याय मिळाला नाही तर मी आत्महत्या करेन."










