भर मैदानात कबड्डीपटूवर झाडल्या गोळ्या, सेल्फी हवा म्हणून जवळ आले अन्…
पंजाबमधील मोहालीत एका कबड्डी खेळाडूची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय.
ADVERTISEMENT

मोहाली: पंजाबमधील मोहाली येथे सोहाना भागात चालू असलेल्या खासगी कबड्डी स्पर्धेदरम्यान सोमवारी (15 डिसेंबर) संध्याकाळी एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली. कबड्डी खेळाडू आणि स्पर्धेचे प्रमोटर राणा बलाचौरिया (पूर्ण नाव: कंवर दिग्विजय सिंग, वय ३०) यांची अज्ञात हल्लेखोरांनी जवळून गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना स्पर्धेच्या संध्याकाळच्या सामन्यांदरम्यान घडली, जेव्हा मैदानात प्रेक्षकांची मोठी गर्दी होती.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, २-३ अज्ञात व्यक्ती मोटारसायकलवर आल्या आणि सेल्फी काढण्याच्या बहाण्याने राणा बलाचौरिया यांच्या जवळ गेले. जेव्हा राणा थांबले, तेव्हा हल्लेखोरांनी अचानक त्यांच्यावर जवळून ४-५ गोळ्या झाडल्या. गोळ्या त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर लागल्या. याशिवाय, दहशत पसरवण्यासाठी हल्लेखोरांनी हवेतही गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाज हा सुरुवातीला लोकांना फटाके असल्याचे वाटले, पण काही क्षणातच मैदानात गोंधळ माजला आणि प्रेक्षक इकडेतिकडे पळू लागले.
राणा बलाचौरिया यांना तात्काळ मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झालेला असल्याने रुग्णालयाने त्यांना मृत घोषित केले.
गँगवारशी संबंधित कारण?










