सुनेने सासऱ्यासोबत नको ते केलं, फक्त 'त्या' एका गोष्टीसाठी...

मुंबई तक

प्रॉपर्टीच्या वादातून एका सुनेने आपल्याच सासऱ्याची हत्या घडवून आणल्याचं वृत्त आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

Daughter in law commited horrific act over property dispute brutally murdered her father in law and threw his body near the bridge
प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: ग्रोक
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रॉपर्टीच्या वादातून सुनेचं भयानक कृत्य!

point

सासऱ्याची निर्दयी हत्या केली अन् मतदेह पुलाजवळ...

Crime News: बिहारच्या पाटणा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे, प्रॉपर्टीच्या वादातून एका सुनेने आपल्याच सासऱ्याची हत्या घडवून आणल्याचं वृत्त आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता मृताची सून राणी कुमारी हिने तिच्या बहीण, दाजी आणि भावासोबत कट रचल्याचे उघडकीस आलं आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

पुलाजवळ वृद्धाचा मृतदेह आढळला अन्... 

3 डिसेंबर रोडी पुनपुन पोलीस स्टेशनच्या पोलिसांना मोहनपूर पुलाजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची सूचना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर, त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. पुढे या प्रकरणाचा तपास केला असता पोलिसांना बरेच महत्त्वाचे पुरावे सापडले. या पुराव्यांच्या आधारे, पोलिसांनी केवळ चार दिवसांतच हत्येत सहभागी असलेल्या चारही आरोपींना अटक केली. 

हे ही वाचा: एक्स्प्रेस वेवर कारमधील जोडप्याचा इंटिमेट Video व्हायरल करणाऱ्या आरोपीचं खळबळजनक विधान! नेमकं काय घडलं?

सासऱ्याची हत्या करण्याची कट 

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताच्या सुनेनेच तिच्या सासऱ्याची हत्या केल्याचं उघडकीस आलं. रानीच्या पतीने दोन लग्न केली होती. मात्र, रानीचे सासरे हे मुलाच्या पहिल्या पत्नीच्या मुलांना जास्त महत्त्व देत असल्याचं तिने सांगितलं, यामुळेच त्यांनाच प्रॉपर्टीमधील हिस्सा देण्याचं तिच्या सासऱ्यांनी सांगितलं होतं. आरोपी महिलेला याच गोष्टीचा प्रचंड राग यायचा आणि त्यावेळी तिने आपल्या सासऱ्याची हत्या करण्याचा कट रचला. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: आता मुंबई ते पुणे प्रवासासाठी केवळ अडीच तास लागणार! देशातील सर्वात उंच केबल-स्टेड ब्रिज अन्...

पोलिसांची माहिती 

मिळालेल्या माहितीनुसार, रानी कुमारीने तिची बहीण पूनम देवी, तिचा दाजी आणि भावासोबत मिळून कट रचून तिच्या सासऱ्याची हत्या केली आणि ओळख पटू नये म्हणून त्याचा मृतदेह मोहनपूर पुलाजवळ फेकून दिला. मात्र, पोलिसांच्या तपासातून आरोपींचा गुन्हा उघडकीस आला. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रकरणातील सगळ्या चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी केली जात आहे. आता, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 
 

हे वाचलं का?

    follow whatsapp