कंपनीतील तरुणासोबत महिलेचे विवाहबाह्य संबंध! रात्री 1 वाजता प्रियकराला भेटण्यासाठी गेली अन्... नेमकं काय घडलं?
काल रात्री (15 डिसेंबर) पीडिता जवळपास 1 वाजताच्या सुमारास तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी गेली. पण, त्यानंतर तिच्यासोबत एक धक्कादायक घटना घडल्याचं वृत्त आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कंपनीतील तरुणासोबत महिलेचे विवाहबाह्य संबंध!
रात्री 1 वाजता प्रियकराला भेटण्यासाठी गेली अन्...
Crime News: विवाहबाह्य प्रेमसंबंधातून धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील एका कंपनीत संतोष कुमार नावाचा तरुण आणि एक विवाहित महिला सिव्हिल इंजीनिअर पदावर कार्यरत होती. त्या दोघांचे एकमेकांसोबत प्रेमसंबंध होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या दोघांची एकमेकांशी ओळख झाली. काल रात्री (15 डिसेंबर) पीडिता जवळपास 1 वाजताच्या सुमारास तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी गेली. पण, त्यानंतर तिच्यासोबत एक धक्कादायक घटना घडल्याचं वृत्त आहे.
कुऱ्हाडीने वार करत पीडितेची हत्या
सिव्हिल इंजीनिअर म्हणून कार्यरत असलेल्या पीडित महिलेवर कुऱ्हाडीने वार करण्यात आले असून बाराबंकी येथील मसौली पोलीस स्टेशन परिसरातील शहाबपुर चौकात पीडितेचा मृतदेह आढळला. भयानक अवस्थेत मृतदेह पाहून लोकांना मोठा धक्का बसला.
प्रियकराच्या कुटुंबियांकडून महिलेचा खून
पीडितेच्या प्रियकराने आपल्या कुटुंबियांवर प्रेयसीची हत्या केल्याचे आरोप केले आहेत. प्रियकराच्या म्हणण्यानुसार, त्याच्याच कुटुंबातील सदस्यांनी महिलेचा खून केला. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 1 वाजताच्या सुमारास मृत महिला तिचा प्रियकर संतोषला भेटण्यासाठी गेली. त्यावेळी, तिचा संतोषच्या कुटुंबियांशी वाद झाला आणि याच भांडणात पीडितेची निर्घृण हत्या करण्यात आली.
हे ही वाचा: टेलीग्रामवर चुकीच्या पद्धतीने विकले अश्लील व्हिडीओ... पोलीस 'त्या' पत्त्यावर पोहोचले अन् धक्कादायक बाब उघडकीस!
संतोष कुमारने त्याच्या आई-वडिलांवर आणि कुटुंबातील इतर सदस्यांवर हत्येचा आरोप केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










