प्रेयसीचे भलत्याच तरुणासोबत प्रेमसंबंध! प्रियकराला भनक लागली अन्... तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भयंकर कृत्य!

मुंबई तक

तुरुंगातून सुटल्यानंतर तरुणाला त्याच्या प्रेयसीचे दुसऱ्याच तरुणासोबत संबंध असल्याचं आढळलं. याच रागातून, त्याने त्याच्या मित्रांसोबत मिळून एक कट रचला आणि संबंधित तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला केला.

ADVERTISEMENT

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भयंकर कृत्य!
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भयंकर कृत्य!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रेयसीचे भलत्याच तरुणासोबत प्रेमसंबंध!

point

प्रियकराला प्रेयसीच्या प्रेमसंबंधाची भनक लागली अन्...

point

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भयंकर कृत्य!

Crime News: मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या रविवारी रात्री जिल्ह्यातील पन्नी मोहल्ला येथे एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. प्राथमिक तपासानुसार, तुरुंगातून सुटल्यानंतर तरुणाला त्याच्या प्रेयसीचे दुसऱ्याच तरुणासोबत संबंध असल्याचं आढळलं. याच रागातून, त्याने त्याच्या मित्रांसोबत मिळून एक कट रचला आणि संबंधित तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु नंतर त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी यासंबंधी गुन्हा दाखल करून मुख्य आरोपीला अटक केली आहे. तसेच, उर्वरित आरोपींचा तपास सुरू आहे.

प्रेयसीचे दुसऱ्याच तरुणासोबत प्रेमसंबंध   

मिळालेल्या माहितीनुसार, अधारताल येथील रहिवासी असलेल्या राहुल झरिया नावाच्या तरुणाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याला एका गुन्हेगारी गुन्ह्यात तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला होता. तुरुंगात असताना त्याचा त्याच्या प्रेयसीशी संपर्क तुटला. दरम्यान, त्याच्या प्रेयसीचे उमरिया गावातील रहिवासी असलेल्या हरिलाल यादव (25) नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. हरिलाल हा व्यवसायाने लोडिंग व्हेईकल ड्रायव्हर होता आणि याच कामातून तो त्याच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होता. 

मित्रांसोबत मिळून रचला हत्येचा कट 

जेव्हा राहुल तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने त्याच्या प्रेयसीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्याच्यासोबत बोलण्यास नकार दिला. नंतर राहुलला कळलं की त्याच्या प्रेयसीचे हरिलाल यादवसोबत प्रेमसंबंध आहेत आणि त्यामुळेच राहुल निराश झाला. प्रेयसीचे दुसऱ्याच तरुणासोबत संबंध असल्याकारणाने त्याला प्रचंड राग आला आणि तिथूनच त्याच्या मनात सूड आणि संतापाच्या भावना वाढल्या. 

हे ही वाचा: लातूर हादरलं! तलावात आढळला पुरुषासह महिलेचा मृतदेह, तीन दिवसांपासून बेपत्ता अन् अचानक...

पोलिसांनी दिली माहिती 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल झारियाने त्याचे मित्र अमर गोटिया, अरविंद रायकवार, राहुल दुबे आणि अभिषेक दुबे यांच्यासोबत मिळून हरिलालला संपवण्याचा कट रचला. ठरल्याप्रमाणे, रविवारी रात्री हरिलालला अधारताल परिसरात आणण्यात आलं. तो तिथे पोहोचताच आरोपींनी त्याच्यावर लोखंडी रॉड आणि इतर शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात पीडित तरुण गंभीररित्या जखमी झाला. या घटनेत जखमी झालेल्या तरुणाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp