'ते' वचन देऊन ठेवले लैंगिक संबंध, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर मोठी खळबळ

मुंबई तक

Crime News : तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीशी लैंगिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील आरोपीचं नाव समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीशी लैंगिक संबंध

point

संबंधित आरोपी गजाआड

Crime News : बिहारमध्ये एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीशी लैंगिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील आरोपीचं नाव समोर आलं आहे. सुफियान अन्सारी असं आरोपीचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी लौरिया पोलीस ठाणे परिसरात एफआरआय दाखल करण्यात आला. पीडितेनं सुफियान विरोधात एफआरआय दाखल केला आहे.

हे ही वाचा : सांगली: अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांकडून अत्याचार; मुलीला विवस्त्रच दिलं सोडून अन्...

आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं...

संबंधित प्रकरणात पीडितेनं एफआरआयमध्ये म्हटलं होतं की, सुमारे दोन महिन्यांपूर्वी आरोपी हा तिच्याच गावातील रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी आला होता. नंतर कथित आरोपी सुफियानने तिला प्रेमसंबंधाच्या जाळ्यात अडकवले आणि लग्नाचे आमिष देखील दाखवले होते. त्यानंतर तिच्यावर शरीरसंबंध ठेवले होते. तीन दिवसांपूर्वी आरोपीने मुलीला त्याच्या दुचाकीवर बसवून घरातूनच पळ काढला होता. तो तिला अनेकदा ठिकठिकाणी घेऊन जात होता.

हे ही वाचा : ट्रेनच्या शौचालयात तरुणी आत शिरली, जणू काही OYO हॉटेलच... सगळा खेळ कॅमेऱ्यात कैद

संबंधित आरोपी गजाआड

नंतर, चौथ्या दिवशीच, तो तिला लौरिया मेळ्याजवळ सोडून निघून गेला होता. संबंधित प्रकरणाच्या घटनेनंतर, पीडितेला तिच्या घरी पोहोचण्यास कसंबसं यश आलं होतं. नंतर तिने घडलेला एकूण प्रकार हा आपल्या कुटुंबाला सांगितला. पोलीस अधिकारी रामेश कुमार शर्मा यांनी सांगितलं की, अर्ज मिळाला आणि या प्रकरणाची चौकशी देखील केली जात आहे. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp