भाडे मागितलं अन् ‘या’ मालकीणबाईंचा जीवच गेला… भाडेकरू जोडप्याचं कृत्य ऐकाल तर तुम्हालाही भरेल कापरं!

मुंबई तक

crime news : फ्लॅट मालक दीपशिखा शर्माचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळला. ती भाडे वसूल करण्यासाठी तिच्या दुसऱ्या फ्लॅटमध्ये गेली होती. भाडेकरू जोडप्याने तिची हत्या केल्याचा आरोप आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बेडखालील सुटकेसमध्ये आढळून आला मृतदेह

point

मोलकरणीला भलताच संशय

Crime News : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील राजनगर एक्सटेंशनमधील ओरा चिमेरा सोसायटीत धक्कादायक घटना घडली. उमेश शर्मा नावाच्या पत्नी दीपशिखा शर्मा यांनी दोन फ्लॅट भाड्याने घेतले होते. ती तिच्या पतीसोबत त्याच फ्लॅटमध्ये राहत होती. त्याच सोसायटीमध्ये तिचा एक फ्लॅटही होता. तिने संबंधित फ्लॅट हा अजय गुप्ता आणि आक्रिती गुप्ता नावाच्या जोडप्याला भाड्याने दिला होता. परंतु, गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी भाडेच दिले नव्हते. यामुळेच आता दीपशिखा शर्मा भाडे मागण्यासाठी गेली होती. पण तिला कसलीही कल्पना नव्हती की, तिला असा वेदनादायक मृ्त्यू दिला जाईल, ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे, तसेच काही लोक देखील हादरून गेले आहेत. ही मन हेलावून टाकणारी घटना बुधवारी 17 डिसेंबर रोजी घडली होती.

हे ही वाचा : मोठी बातमी: माणिकराव कोकटेंचा 'गेम ओव्हर', मुख्यमंत्री नाही तर 'या' नेत्याकडे दिला राजीनामा; कोणत्याही क्षणी होणार अटक

बेडखालील सुटकेसमध्ये आढळून आला मृतदेह

दीपाशिखा शर्माचा मृतदेह हा एका सुटकेसमध्ये आढळून आला होता. अजय गुप्ता आणि आकृती गुप्ता यांच्याच बेडीखाली ही सुटकेस आढळून आल्याचे वृत्त समोर आले. या घटनेनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे. एका सुटकेसमध्ये आढळून आल्याचे वृत्त सापडल्याचे वृत्त आहे. या घटनेनं सर्वांनाच धक्का बसला आहे. दीपाशिखा शर्माची गळा दाबून हत्या करण्यात आली.

मोलकरणीला भलताच संशय

दीपशिखा शर्मा ही दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या अजय आणि आकृतीकडून भाडे घेण्यासाठी आली होती, तेव्हा मोलकरणीने बराच वेळ वाट पाहिली होती पण ती परतलीच नाही. मोलकरणीला भलताच संशय आला होता. ज्या अपार्टमेंटमध्ये भाडे वसुलीचं काम करण्यासाठी देली होती आणि परिस्थिती अगदी संशयास्पद असल्यासारखी वाटली होती. तिने आपार्टमेंटची झाडाझडती केली तेव्हा तिला एक लाल रंगाची सुटकेस सापडली, नंतर दीपाशिखा शर्माचा मृतदेह सापडला.

हे ही वाचा : फ्लॅटमध्ये एक कॉलगर्ल आणि 5 तरूण! सापडल्या 'त्या' गोळ्या आणि...

संबंधित प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले तेव्हा त्यांना फ्लॅट मालक दीपशिखा शर्मा सायंकाळी फ्लॅटमध्ये प्रवेश करताना दिसली, पण नंतर ती घराबाहेर पडताना दिसली नाही. भाडेकरू जोडप्याने दीपशिखाची हत्या करण्यात आली. तसेच नंतर मृतदेह हा सुटकेसमध्ये बंद करण्यात आला, नंतर तो मृतदेह फ्लॅटमध्ये लपवण्यात आला, असा आरोप करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp