पुणे : नामांकित डॉक्टरकडून मोलकरणीला चुकीचा स्पर्श अन् अश्लील चाळे, कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल
Pune Crime : मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही गेल्या काही काळापासून संबंधित डॉक्टरांच्या घरी मोलकरीण म्हणून काम करत होती. कामाच्या दरम्यान आरोपी डॉक्टरने वेगवेगळी कारणे सांगून वारंवार तिच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिने केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुणे : नामांकित डॉक्टरकडून मोलकरणीला चुकीचा स्पर्श अन् अश्लील चाळे
कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल
Pune Crime : पुणे शहरातील कोंढवा भागात माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली असून, एका नामांकित डॉक्टरने घरकाम करणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या व्यक्तीकडून अशा प्रकारचे कृत्य घडल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
वारंवार अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही गेल्या काही काळापासून संबंधित डॉक्टरांच्या घरी मोलकरीण म्हणून काम करत होती. कामाच्या दरम्यान आरोपी डॉक्टरने वेगवेगळी कारणे सांगून वारंवार तिच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिने केला आहे. सुरुवातीला नोकरी जाण्याच्या भीतीने तिने हा प्रकार सहन केला. मात्र, हा छळ दिवसेंदिवस वाढत गेल्याने अखेर तिने आवाज उठवण्याचा निर्णय घेतला.
7 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीत आरोपीने अनेकदा तिच्याशी गैरवर्तन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पीडितेने विरोध दर्शविल्यानंतर आरोपीने तिला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. त्यामुळे मानसिक तणावात असलेल्या महिलेने काही काळ गप्प राहणे पसंत केले. मात्र, आरोपीचा आत्मविश्वास इतका वाढला की त्याने उघडपणे अश्लील चाळे करण्यास सुरुवात केल्याचे समोर आले आहे.
एका घटनेत पीडिता घरात पाणी व दूध देण्यासाठी गेली असताना आरोपीने तिचा हात पकडून गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. हा प्रकार सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यानंतर पीडित महिलेने अखेर धाडस दाखवत कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी डॉ. साजीद शेख याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.










