मोठी बातमी: माणिकराव कोकटेंचा 'गेम ओव्हर', मुख्यमंत्री नाही तर 'या' नेत्याकडे दिला राजीनामा; कोणत्याही क्षणी होणार अटक
Manikrao Kokate Resignation: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून आता त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

(फाइल फोटो)
मुंबई: महाराष्ट्राचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केला आहे. नाशिकच्या स्थानिक आणि जिल्हा न्यायालयाने सदनिका घोटाळ्यात माणिकराव यांना दोषी ठरवलं होतं. ज्यानंतर त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सगळ्या कारवाईनंतर माणिकराव कोकाटे यांनी आज (18 डिसेंबर) अजित पवार यांच्याकडे राजीनामा सोपवला. ज्यानंतर अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला आहे.
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा

अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला










