नवी मुंबई मनपा : महापौर आणि उपमहापौर भाजपचाच, शिंदे गटाच्या उमेदवारांची माघार

मुंबई तक

Navi Mumbai Mayor : नवी मुंबई महानगरपालिकेला नवा महापौर आणि उपमहौपर मिळाला आहे. या दोन्ही पदांवर भाजपच्या नगरसेवकांची निवड झाली आहे. शिंदे गटातर्फे दाखल करण्यात आलेले अर्ज मागे घेण्यात आल्याने भाजपला ही दोन्ही पदे बिनविरोध मिळाली. महापौरपदी सुजाता पाटील आणि उपमहापौर पदी दशरथ भगत यांची निवड झाली आहे.

ADVERTISEMENT

navi mumbai mayor
navi mumbai mayor
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नवी मुंबई मनपा : महापौर आणि उपमहापौर भाजपचाच

point

शिंदे गटाच्या उमेदवारांची माघार

Navi Mumbai Mayor : नवी मुंबई महानगरपालिकेला नवा महापौर आणि उपमहौपर मिळाला आहे. या दोन्ही पदांवर भाजपच्या नगरसेवकांची निवड झाली आहे. शिंदे गटातर्फे दाखल करण्यात आलेले अर्ज मागे घेण्यात आल्याने भाजपला ही दोन्ही पदे बिनविरोध मिळाली. महापौरपदी सुजाता पाटील आणि उपमहापौर पदी दशरथ भगत यांची निवड झाली आहे.

हे ही वाचा : 'कोडगेपणा अनाकलनीय ...', 'मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोडींबाबत राज ठाकरेंचं सविस्तर भाष्य

शिंदे गट आणि भाजपमध्ये चुरस

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान शिवसेना विरुद्ध भाजपा अशी जी राजकीय टक्कर पाहायला मिळाली होती, तीच परिस्थिती पुन्हा एकदा दिसून आली होती. महापैर निवडीत भाजप आणि शिंदेगटात चढाओढ झाल्याची पहायला मिळाली. शिवसेनेच्या वतीने महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे ही निवडणूक अत्यंत रोचक झाली होती. भाजपकडे स्पष्ट बहुमत असतानाही, शिवसेनेच्या आव्हानामुळे या निवडणुकीची जोरदार चर्चा रंगली होती.

शिंदे गटाची माघार आणि भाजपचा विजय

या निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान एक मोठी राजकीय घडामोड घडली. शिंदेगटाकडून महापौर पदासाठी दाखल करण्यात आलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. यामुळे भाजपाच्या उमेदवार सुजाता पाटील यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. त्या पाठोपाठ उपमहापौर पदासाठीही शिंदे गटाने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. परिणामी, भाजपाचे उमेदवार दशरथ भगत यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली.

हे वाचलं का?

    follow whatsapp