अनावधानाने माझ्याकडून चुकीचा उल्लेख झाला, अजितदादांच्या अपघाताची वेळेबाबत राजेश टोपेंचं स्पष्टीकरण
Rajesh Tope on Ajit Pawar Death : राजेश टोपे यांनी फेसबुक पोस्ट करत याबाबत महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलंय. राजेश टोपे म्हणाले, "मा.अजितदादा यांचे अपघाती निधन हा आम्हा सर्वांसाठी खूप तीव्र धक्का होता. या दुःखद प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना बातमी समजल्याच्या वेळेबाबत अनावधानाने माझ्याकडून चुकीचा उल्लेख झाला. कृपया, या कठीण व संवेदनशिल काळात ही बाब समजून घ्यावी, ही विनंती"
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अनावधानाने माझ्याकडून चुकीचा उल्लेख झाला
अजितदादांच्या अपघाताची वेळेबाबत राजेश टोपेंचं स्पष्टीकरण
Rajesh Tope on Ajit Pawar Death : मुंबई : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात मृत्यू झालाय. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. अजूनही महाराष्ट्र या धक्क्यातून सावरलेला नाही. दरम्यान, या दुःखद घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निधनाची बातमी समजल्याच्या वेळेबाबत आपल्याकडून अनावधानाने चुकीचा उल्लेख झाल्याचे माजी मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
राजेश टोपे यांनी फेसबुक पोस्ट करत याबाबत महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलंय. राजेश टोपे म्हणाले, "मा.अजितदादा यांचे अपघाती निधन हा आम्हा सर्वांसाठी खूप तीव्र धक्का होता. या दुःखद प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना बातमी समजल्याच्या वेळेबाबत अनावधानाने माझ्याकडून चुकीचा उल्लेख झाला. कृपया, या कठीण व संवेदनशिल काळात ही बाब समजून घ्यावी, ही विनंती"
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक तसेच सर्वसामान्य जनतेमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कार्याची आठवण करून दिली आहे. या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांच्या स्पष्टीकरणाकडेही संवेदनशीलतेने पाहिले जात असून, दुःखाच्या प्रसंगी संयम राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे.










