फ्लॅटमध्ये एक कॉलगर्ल आणि 5 तरूण! सापडल्या 'त्या' गोळ्या आणि...
Crime News : पोलिसांनी वेश्याव्यवसाय करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. गोळीबार घटनेतील आरोपीसह सहा जणांना अटक करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कॉल गर्लची कसून चौकशी
आरोपीला अटक
नेमकं काय घडलं?
Crime News : देशभरात अवैधपणे सुरु असलेल्या सेक्स रॅकेटनं वर डोकं काढलं आहे. मोठ्या प्रमाणात वेश्यव्यवसाय फोफावत असल्याचे आता पोलिसांच्या निदर्शनास आले. एका वेळ निश्चित करण्यात आली असून स्टेशन हाऊस ऑफिसर धनंजय सिंह यांनी एक गुप्त पथक तयार केलं. पोलिसांनी दार ठोठावलं तेव्हा दरवाजा आतून बंद होता. जेव्हा दरवाजा उघडण्यात आला आणि आतील लोकांनी पोलिसांना पाहिलं, ज्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. दाराआड भलतंच कांड सुरु होतं. पोलिसांना छापा टाकत सर्वांना ताब्यात घेतलं. या घटनेनं परिसरातील कॉलनीत खळबळ माजली. हा धक्कादायक प्रकार आता बरेलीत उघडकीस आल्याचे वृत्त समोर आलं.
हे ही वाचा : 'ते' वचन देऊन ठेवले लैंगिक संबंध, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर मोठी खळबळ
कॉल गर्लची कसून चौकशी
अटक करण्यात आलेल्या कॉल गर्लची कसून चौकशी करण्यात आली असता, संपूर्ण घटना उघडकीस आल्याचे वृत्त समोर आले. तिने सांगितलं की, ती तिच्या आकर्षणाने आणि हावभावांनी पुरुषांना तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायची. तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिने अनेकांना आपल्या फ्लॅटवर आणलं आहे. नंतर त्याच्यासोबत शरीरसंबंध ठेवले आहेत.
आरोपीला अटक
या छाप्यातील आरोपी रोहित ठाकूरला अटक करणं हे या मागील मोठं यश होतं. तो पोलिसांना चुकवून, त्यांची फसवणूक करूनच येथे आला होता. रोहितसह, सोनू, बसंत. अभय, विक्रम आणि सुधांशू यांनाही पोलिसांनी रंगेहाथ पकडलं होतं. छाप्यादरम्यान, खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ससाठा देखील आढळून आला होता.
हे ही वाचा : पुण्यात कोचिंग सेंटरमध्ये 15 वर्षीय विद्यार्थ्याकडून मित्रावर चाकूने वार करत संपवलं, शिक्षकासमोर भयंकर घडलं
घटनास्थळावरून पोलिसांनी तब्बल सहा मोबाईल आणि 4 हजार 100 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आले. हे सर्व पुरावे सील करण्यात आले असून अशा अवैध व्यापारी करणाऱ्यांना न्यायालयात पाठवलं आहे.










