दोस्तीत कुस्ती! मित्राला फुल पाजली, 'त्या' कारणावरून छतावरून फेकलं, हाडं तुटून दुर्दैवी अंत

मुंबई तक

crime news : पत्नीशी बोलण्याच्या मुद्द्यावरून पतीने आपल्याच एका मित्राला दारू पाजली होती. नंतर त्या मुलीला छतावरून खाली फेकले होते.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

व्यक्तीने आपल्याच मित्राला दारू पाजली आणि छतावरून फेकून दिले

point

सीसीटीव्ही तपासले आणि नंतर मृत व्यक्ती...

point

नेमकं काय घडलं? 

Crime News : एका व्यक्तीने आपल्या पत्नीशी का बोलतो असा जाब विचारला होता. नंतर त्याने पत्नीशी न बोलण्यास सांगितलं होतं. हाच राग डोक्यात ठेऊन एका व्यक्तीने आपल्याच मित्राला दारू पाजली आणि छतावरून फेकून दिले. या घटनेत मोहम्मद नौशाद उर्फ राहुल (वय 35) याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मध्य दिल्लीतील पटेलनगरमध्ये घडली. आहे. या प्रकरणातील आरोपीचं नाव संदीप असे असून त्याला देखील अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा : अहो, मला भेटायला या, सौंदर्याची खाण असलेल्या DSP चा उद्योगपतीवर लव्ह ट्रॅप, चॅटींग सोशल मीडियावर व्हायरल!

नेमकं काय घडलं? 

या प्रकरणातील आरोपी संदीप हा मोहम्मदचा ओळखीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघेही राजस्थानमधील हरियाणा हॉटेलमध्ये काम करत होते. आरोपीने पीडिताला यापूर्वी दारू पाजली होती. तो छतावरून पडला आणि नंतर त्याचे डोकं फुटलं आणि अनेक हाडं देखील मोडली. याच प्रकरणात आता आरोपीला दोन दिवसांनी अटक करण्यात आल्याचे वृत्त समोर आले. 

याच प्रकरणात आता मध्य जिल्हा पोलीस उपायुक्त असलेले निधीन वालसन यांनी सांगितलं की, 10 डिसेंबर रोजी दुपारी 12 : 30 वाजता मोहम्मद नौशाद एका इमारतीवरून पडल्याचे वृत्त समोर आले. या प्रकरणात पत्नीने आपल्या पतीला एका रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याचे वृत्त समोर आले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. 

हे ही वाचा : पुण्यात हुंडा प्रथा सुरुच, फॉर्च्युनरसह 55 तोळे सोने, विवाहितेवर सासऱ्याने विनयभंग केल्याचा आरोप

सीसीटीव्ही तपासले आणि नंतर मृत व्यक्ती...

याच प्रकरणात आता मृत राहुलचे शवविच्छेदन केले होते. राहुल हा दिल्लीतीली बलजीत नगर येथील संजय पार्क येथील रहिवासी आहे. या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळावरील सर्व सीसीटीव्ही तपासले आणि नंतर मृत व्यक्ती एका अज्ञात पुरुषासोबत आढळली. तेव्हा स्थानिकांची देखील चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी संदीप उर्फ गुंजा सोनू अशी आहे. पोलिसांना त्याने हत्येचा कबुलीनामा दिला.

हे वाचलं का?

    follow whatsapp