Pradnya Satav यांच्या जाण्यानं काँग्रेसची गणितंच फिस्कटलीत, फडणवीसांनी एका दगडातच…
भाजपने प्रज्ञा सातव यांना आपल्या पक्षात घेऊन काँग्रेसला विधान परिषदेत मोठा हादरा दिला आहे.
ADVERTISEMENT

मुंबईः अंबादास दानवेंच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षनेता पद रिक्त. पावसाळी अधिवेशनादरम्यान सतेज पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. विधान परिषदेतील संख्याबळ आपल्या बाजूने असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले असून, विरोधी पक्षनेतेशिवाय कामकाज चालू देणार नसल्याचा ठाम इशाराही सरकारला दिला होता. मात्र आता संख्याबळाबाबत काँग्रेसचा घोळ झालाय. कारण आहे प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश आणि आमदारीकाचा त्यांनी दिलेला राजीनामा. विधानपरिषदेत काँग्रेसला मिळू शकणार विरोधी पक्षनेतेपद आता गोत्यात आलं आहे कसं तेच पाहूयात.
महाराष्ट्र विधान परिषदेचे एकूण 78 सदस्य आहेत. त्यातील 30 सदस्य विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात. 22 सदस्य विविध स्थानिक प्राधिकारी संस्थांमार्फत निवडले जातात. तसंच 7 सदस्य पदवीधर मतदारसंघांमधून तर 7 सदस्य शिक्षक मतदारसंघांमधून निर्वाचित होत असतात. याव्यतिरिक्त 12 सदस्य हे राज्यपालांद्वारे नामनियुक्त केले जातात.
आता सदस्यसंख्येवर एक नजर
एकूण 78 सदस्य विधानपरिषदेत असतात. यापैकी
भाजप-22
राष्ट्रवादी अजित पवार- 8
शिवसेना- 7
तर विरोधी पक्षात
राष्ट्रवादी शरद पवार- 03
शिवसेना ठाकरे- 06
काँग्रेस - 08 होते आता 07
दोन अपक्ष आहेत.










