सोशल मीडियावरील 'त्या' व्हायरल व्हिडीओमुळे तरुणीने केली आत्महत्या, आईलाही हृदयविकाराचा झटका; नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Crime News : प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन जमावाने एका जोडप्याला मारहाण केली. त्यांचा व्हिडीओ करुन सोशल मीडियावर टाकला. यामुळे घाबरुन जाऊन तरुणीने आपले जीवन संपवले आहे. यानंतर तिच्या आईला हृदय विकाराचा तीव्र झटका आला असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील ही घटना आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोशल मीडियावरील 'त्या' व्हायरल व्हिडीओमुळे तरुणीने केली आत्महत्या,

point

आईलाही हृदयविकाराचा झटका; नेमकं काय घडलं?

Crime News : प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन जमावाने एका जोडप्याला मारहाण केली. त्यांचा व्हिडीओ करुन सोशल मीडियावर टाकला. यामुळे घाबरुन जाऊन तरुणीने आपले जीवन संपवले आहे. यानंतर तिच्या आईला हृदय विकाराचा तीव्र झटका आला असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील ही घटना आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हे ही वाचा : 'द फॅमिली मॅन' सिनेमातील अभिनेत्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, ‘एक दूजे के लिए’ मधून केला होता डेब्यू

खांबाला बांधून मारहाण, गावातून धिंड

गुरुवारी (5 फेब्रुवारी) रात्री काही गावकऱ्यांनी या तरुणीला शेजारील गावातील एका तरुणासोबत पाहिले. त्यानंतर संतप्त जमावाने या दोघांना पकडले. तरुणी कशीबशी निसटली पण तरुणाला पकडून खांबाला बांधण्यात आले. कडाक्याच्या थंडीत त्याचे कपडे काढून रात्रभर त्याला मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्या गुप्तांगावरही वार करण्यात आले. जमाव एवढ्यावरच थांबला नाही. शुक्रवारी सकाळी तरुणाच्या तोंडाला काळे फासून, त्याचे मुंडण करुन त्याला गावभर फिरवण्यात आले. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ करुन सोशल मीडियावर टाकण्यात आला.

तरुणीची आत्महत्या

हा  व्हिडीओ जेव्हा तरुणीपर्यंत पोहोचला, तेव्हा तिला जबरदस्त मानसिक धक्का बसला. हा अपमान सहन न झाल्याने शुक्रवारी दुपारी आई-वडील घरी नसल्याचे पाहून तिने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. तरुणीच्या वडिलांनी हा एक नियोजित कट असल्याचा आरोप केला आहे. आपल्या मुलीला कट रचून घराबाहेर बोलावण्यात आले आणि नंतर तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुलीचा मृतदेह बघून आईला हृदय विकाराचा तीव्र झटका आला असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp