'द फॅमिली मॅन' सिनेमातील अभिनेत्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, ‘एक दूजे के लिए’ मधून केला होता डेब्यू
Actor Sunil Thapa Passes Away : सुनील थापा यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीने एक बहुरंगी कलाकार गमावला आहे. त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात बॉलिवूडमधून केली होती. ज्येष्ठ अभिनेते देव आनंद यांनी त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत संधी दिली होती. 1981 मध्ये ‘एक दूजे के लिए’ या गाजलेल्या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात कमल हासन आणि रती अग्निहोत्री मुख्य भूमिकेत होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'द फॅमिली मॅन' सिनेमातील अभिनेत्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
वयाच्या 68 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Actor Sunil Thapa Passes Away : नेपाळी प्रेक्षकांमध्ये ‘राते काइला’ या नावाने घराघरात ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते सुनील थापा यांचे वयाच्या 68 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच नेपाळसह भारतातील चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. सुनील थापा यांनी केवळ नेपाळीच नव्हे तर बॉलिवूड आणि भोजपुरी चित्रपटसृष्टीतील अनेक सिनेमांत काम केलं होतं. त्यांच्या कुटुंबातील सदस्य काठमांडू येथे पोहोचल्यानंतर त्यांच्या निधनाबाबत अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुनील थापा यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीने एक बहुरंगी कलाकार गमावला आहे. त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात बॉलिवूडमधून केली होती. ज्येष्ठ अभिनेते देव आनंद यांनी त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत संधी दिली होती. 1981 मध्ये ‘एक दूजे के लिए’ या गाजलेल्या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात कमल हासन आणि रती अग्निहोत्री मुख्य भूमिकेत होते. पदार्पणाच्या पहिल्याच चित्रपटात सुनील थापा यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
यानंतर त्यांना सलग अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या. 1982 मध्ये ‘मशाल’ या चित्रपटातून त्यांनी नेपाली चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. मात्र सुरुवातीला त्यांना फारसे यश मिळाले नाही. त्यानंतर तब्बल सात वर्षांनंतर आलेल्या ‘चिनो’ या चित्रपटाने त्यांचे करिअरच बदलून टाकले. या चित्रपटात त्यांनी साकारलेला ‘राते काइला’* हा खलनायक प्रचंड लोकप्रिय ठरला. ‘चिनो’ला आजही नेपाली सिनेमाचा ‘शोले’ म्हटले जाते. या भूमिकेमुळे सुनील थापा यांना नेपाळचा ‘गब्बर’ अशी ओळख मिळाली.










