बर्थडे पार्टीत महिला डॉक्टरला नशायुक्त पिझ्झा खाऊ खातला, बेशुद्ध होताच रुममध्ये नेऊन दानिशने केला बलात्कार
Crime News : महिला डॉक्टरवर पिझ्झामधून अमली पदार्थ देऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बर्थडे पार्टीत महिला डॉक्टरला नशायुक्त पिझ्झा खाऊ खातला
बेशुद्ध होताच रुममध्ये नेऊन दानिशने केला बलात्कार
Crime News : एमडीएस म्हणजेच मास्टर इन डेंटल सर्जरीची तयारी करणाऱ्या एका महिला डेंटिस्टवर पिझ्झामधून नशायुक्त पदार्थ देऊन अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पीडित महिला डॉक्टर मूळची जमशेदपूरची असून ती सध्या रांचीमध्ये राहून उच्च शिक्षणाचे धडे गिरवत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी दानिश याला पश्चिम बंगालमधून बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात आणि शहरात मोठी खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. झारखंडची राजधानी असलेल्या रांचीमधील लालपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही अत्यंत लज्जास्पद आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
वाढदिवसाची पार्टी आणि नशायुक्त पिझ्झा
ही संपूर्ण घटना 9 एप्रिल रोजी घडली, जेव्हा पीडित डेंटिस्टला तिच्या एका मैत्रिणीने लालपूर येथील घरी आपल्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी बोलावले होते. सायंकाळी साधारण 5 वाजता पीडिता आपल्या मैत्रिणीच्या घरी पोहोचली. या पार्टीमध्ये एकूण 5 लोक सहभागी होते, ज्यामध्ये 3 मुले आणि 2 मुलींचा समावेश होता. रात्री 8 वाजेच्या सुमारास केक कापल्यानंतर पीडितेला भूक लागल्याचे तिने सांगितले. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या दानिश नावाच्या तरुणाने तिला खाण्यासाठी पिझ्झा आणून दिला. पीडितेचा असा आरोप आहे की, हा पिझ्झा खाल्ल्यानंतर काही वेळातच तिला चक्कर येऊ लागली आणि तिची प्रकृती बिघडली. स्वतःला सावरणे कठीण झाल्यामुळे ती विश्रांती घेण्यासाठी जवळच्या एका खोलीत गेली. याच संधीचा फायदा घेत दानिश त्या खोलीत शिरला आणि पीडितेच्या बेशुद्धावस्थेचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केले.
प्रकृती खालावली आणि आरोपीला अटक
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पीडितेला शुद्ध आली, तेव्हा तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या मैत्रिणीला सांगितला. त्यानंतर मैत्रिणीने तिला हॉस्टेलवर सोडले, मात्र या घटनेमुळे पीडितेची मानसिक आणि शारीरिक स्थिती सातत्याने बिघडत गेली. अखेर 11 एप्रिल रोजी तिची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याचे पाहून तिच्या शिवम नावाच्या एका मित्राने तिला रांची येथील ऑर्किड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयाने या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर लालपूर पोलीस तेथे पोहोचले आणि त्यांनी पीडितेचा जबाब नोंदवून घेतला. या जबाबाच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या म्हणजेच बीएनएसच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.









