बापाच्या डोक्यात तिडीक गेली, सेप्टिक टँकमध्ये 10 महिन्यांचं बाळ फेकलं..
Delhi crime news : दुसऱ्या मुलीच्या जन्माने व्यथित झालेल्या हैवान वडिलांनी 10 महिन्यांच्या मुलीची हत्या केली. या घटनेनंतर आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अपहरणाचा खोटा कट रचला होता, स्वत:च पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांच्या तपासातून हा त्यांचा कट असल्याचं उघडकीस आलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आईने आजारी असलेल्या मोठ्या मुलीला झोपवलं अन्..
चिमुकलीला सेप्टीक टँकमध्ये फेकून संपवलं
Delhi baby girl murder case: नवी दिल्लीच्या भालसा डेअरी परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दुसऱ्या मुलीच्या जन्माने व्यथित झालेल्या हैवान वडिलांनी 10 महिन्यांच्या मुलीची हत्या केली. या घटनेनंतर आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अपहरणाचा खोटा कट रचला होता, स्वत:च पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि पोलिसांच्या तपासातून हा त्यांचा कट असल्याचं उघडकीस आलं. आरोपी वडिलांनीची ओळख दीपक अशी समोर आली असून त्याला अटक करण्यात आली. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
हे ही वाचा : बुलढाण्यात बापानं चारही पोरांना विहिरीत फेकलं अन्... मन सून्न करणारी घटना
आईने आजारी असलेल्या मोठ्या मुलीला झोपवलं अन्..
रविवारी सकाळी आरोपी वडिलांनी पोलिसांना सांगितलं की, तो पहाटे 5 वाजताच्या सुमारास दूध आणण्यासाठी गेला होता. आईने आजारी असलेल्या मोठ्या मुलीला झोपवलं, आईला डुलका लागला. लहान मुलगी दूध पीत होती. काही वेळानंतर ते वडील घरी परतले असता, मुलगी तिथे नव्हती. या प्रकरणात कुटुंबीयांनी शोध घेतला असता, त्यांना रस्त्यावर बाळाची दुधाची बाटली आढळून आली. यानंतर पोलिसांनी प्रकरणाची माहिती देण्यात आली.
या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि तपासासाठी अनेक पथके तैनात करण्यात आली आहे. संबंधित सीसीटीव्हीचे फुटेज तपासून स्थानिक रहिवाशांची चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान, मुलीचे वडील तिला घेऊन जात असल्याचे दृश्य आहे.
हे ही वाचा : समजून घ्या: कच्चं तेल स्वस्त झालं तरीही पेट्रोल-डिझेल का महाग... सरकार का करतंय असं?
आरोपीने चिमुकली सेप्टीक टँकमध्ये फेकून तिची केली हत्या
या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. या प्रकरणाचा गुन्हा दाखल करून घटनेचा कबुलीनामा दिला. पोलिसांच्या सूत्रांनुसार, दुसरी मुलगी जन्माला आल्याच्या रागातूनच आरोपीने मुलीची हत्या केली. आरोपीने सेप्टीक टँकमध्ये मुलीला फेकलं, अशातच त्या चिमुकलीची दुर्दैवी अंत झाला.









