पैशासाठी कायपण! नवऱ्याने आपल्या बायकोचेच दुसरे लग्न लावून दिले, पण...
झटपट पैसे मिळवण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. एका नवऱ्याने आपल्या बायकोचंच दुसरं लग्न लावून दिलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पैशासाठी कायपण!
नवऱ्यानं आपल्या बायकोचंच दुसरं लग्न लावून दिलं
पण...
Crime News : झटपट पैसे मिळवण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. एका नवऱ्याने आपल्या बायकोचंच दुसरं लग्न लावून दिलं. लग्नानंतर नवरदेवावर हुंड्याच्या आणि घरगुती हिंसाचाराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवायचे आणि पैसे लाटायचे अशी योजना त्याने आखली होती. मात्र सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाहीतच. एक चूक झाली आणि सगळंच उघडकीस आलं. याप्रकरणातील मुख्य आरोपी अजय उर्फ सोनू चौहान आणि त्याची बायको राधा उर्फ दीक्षा हिला ताब्यात घेतले आहे. ही घटना मध्यप्रदेशातील आहे.
लग्नात खर्च केले 6 लाख रुपये
या नवरा-बायकोच्या कटाला बळी पडलेल्या व्यक्तीचं नाव आहे रतन शर्मा. ते जबलपूरमधील एका खासगी रुग्णालयात टीम लीडर पदावर कार्यरत आहेत. पीडित कुटुंबाला 15 एप्रिल रोजी सोनू तिवारी नावाच्या व्यक्तीने या मुलीचे स्थळ सुचवले होते. अजय चौहान याला आपल्या एका गरीब आणि अनाथ मानलेल्या बहिणीचे म्हणजेच राधा उर्फ दीक्षा मुद्गल हिचे लग्न करायचे आहे, असे त्यांना सांगण्यात आले. 20 एप्रिल रोजी मुलगी दाखवण्यात आली. ती कुटुंबियांना चांगलीच पसंत पडली. त्यामुळे लवकर लग्न आटपण्याच्या नादात त्यांनी 27 एप्रिल रोजी साखरपुडा केला आणि 7 मे रोजी विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. या लग्नात पीडित रतन शर्मा यांनी जवळपास 6 लाख रुपये खर्च केले. एवढेच नव्हे तर, आरोपींनी ब्युटी पार्लर आणि इतर खर्चाच्या नावाखाली स्वतंत्रपणे 50 हजार रुपये देखील उकळले.
हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात 12 तास धोक्याचे! पाऊस धिंगाणा घालणार, 14 जिल्ह्यांना अलर्ट
यामुळे प्रकरण उघडकीस
लग्नानंतर जेव्हा नवरी मुलगी राधा उर्फ दीक्षा तिच्या सासरी म्हणजेच रतन शर्मा यांच्या घरी राहू लागली, तेव्हा तिच्या संशयास्पद हालचालींमुळे कुटुंबीयांना संशय आला. ती लपून-छपून मोबाईलवर कोणाशीतरी बोलत असायची. एक दिवस जेव्हा तिचा मोबाईल तपासण्यात आला, तेव्हा तिच्या व्हॉट्सॲप चॅटमधून एक अत्यंत धक्कादायक खुलासा झाला. ज्या अजय चौहानला ती आपला भाऊ सांगत होती, तो प्रत्यक्षात तिचा नवरा असल्याचे चॅटमधून उघड झाले. या दोघांनी 2024 मध्ये आग्रा येथील एका आर्य समाज मंदिरात प्रेमविवाह केला होता आणि ते एकत्र राहत होते.
हे ही वाचा : पुण्याची गोष्ट : देशातील सर्वाधिक लांब उड्डाणपूल पुण्याला जोडणार, वाहतूक कोंडी सुटणार
अजयचे दोन विवाह
पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपी अजय चौहान याचे पहिले लग्न 2009 मध्येच झाले असून पहिल्या पत्नीपासून त्याला मुलेही आहेत. दीक्षा ही त्याची दुसरी पत्नी होती. अजयने आपल्या पहिल्या पत्नीला आणि मुलांंचा खर्च भागवण्यासाठी आणि पैशांच्या हव्यासापोटी आपल्या या दुसऱ्या पत्नीचे लग्न रतन शर्मा यांच्याशी लावून दिले होते. झाशीरोड पोलीस ठाण्याचे प्रभारी शक्ती सिंह यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी अजय चौहान याला अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. पोलीस आता या टोळीत सामील असलेल्या सोनू तिवारीसह इतर आरोपींचा शोध घेत आहेत.









