आई भोंदू बाबाच्या जाळ्यात, मुलानं थेट शेवटच केला; पोलिसांसह सगळेच चक्रावले
एका भोंदूबाबाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. 'परदेशी बाबा' असं हत्या झालेल्या या तांत्रिकाचं नाव आहे. या हत्याकांड प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून मुख्य आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आई भोंदू बाबाच्या जाळ्यात
मुलानं थेट शेवटच केला
पोलिसांसह सगळेच चक्रावले
Crime News : अनेक भोंदूबाबांची प्रकरणं बाहेर येत असतानाच एका भोंदूबाबाचीच हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. 'परदेशी बाबा' असं हत्या झालेल्या या तांत्रिकाचं नाव आहे. या हत्याकांड प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून मुख्य आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीच्या माहितीवरून गुन्ह्यात वापरलेला धारदार सुरा देखील जप्त केला आहे. नागेंद्र असं आरोपीचं नाव असून त्याला मलिहाबाद रेल्वे स्टेशनजवळून ताब्यात घेतले. उत्तर प्रदेशातील सीतापूर येथील ही घटना आहे.
जंगलात आढळला परदेशी बाबाचा मृतदेह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 मे रोजी संदना परिसरातील नदीकाठच्या जंगलात एक अज्ञात मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर तपासादरम्यान या मृतदेहाची ओळख सत्यनारायण यादव उर्फ परदेशी बाबा (रा. नजर नगर, मलिहाबाद, लखनऊ) अशी पटली. या खळबळजनक घटनेनंतर संदना पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला होता.
हे ही वाचा : सरकारी कार्यालयातील महिलांच्या टॉयलेटमध्ये हिडन कॅमेरा.., अन् पुढे काय घडलं?
का केली हत्या?
पोलीस चौकशीदरम्यान आरोपी नागेंद्रने आपला गुन्हा कबूल केला असून हत्येमागचे धक्कादायक कारण सांगितले आहे. नागेंद्रच्या आईवर परदेशी बाबा गेल्या 17-18 वर्षांपासून उपचार करत होता. बाबाने आपल्या आईला तंत्र-मंत्राच्या जाळ्यात अडकवून ठेवले आहे, असा संशय नागेंद्रला होता. याच कारणावरून सुमारे 6 महिन्यांपूर्वी त्याचा बाबासोबत वादही झाला होता. तेव्हापासूनच तो सूड उगवण्याची संधी शोधत होता आणि गेल्या दोन महिन्यांपासून तो हत्येचा कट रचत होता.
हे ही वाचा : तरुणाने भररस्त्यात महिलेचा मागून ड्रेस ओढला अन्.. लज्जास्पद प्रकार
'अशी' केली हत्या
घटनेच्या दिवशी आरोपी नागेंद्र एका महिलेवर उपचार करण्याचे आणि त्याचे चांगले पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून बाबाला आपल्या दुचाकीवर बसवून जंगलात घेऊन गेला. तिथे त्याने सुऱ्याने गळा चिरून बाबाची निर्घृण हत्या केली. अंधश्रद्धेपोटी हत्येनंतर त्याने बाबाच्या हात आणि पायांमध्ये 11 खिळे ठोकले, जेणेकरून तांत्रिकाचा आत्मा भटकणार नाही, असा त्याचा समज होता. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने स्वतःचे कपडे, बूट, हातमोजे आणि मृत बाबाचे साहित्य जाळून टाकले, तसेच मोबाईल फोन नदीत फेकून दिला. पोलिसांनी त्याची दुचाकी आणि हत्येचा सुरा जप्त केला असून पुढील कारवाई सुरू आहे.









