तरुणाने भररस्त्यात महिलेचा मागून ड्रेस ओढला अन्.. लज्जास्पद प्रकार
Woman harassment viral video: माणुसकीला लाज आणणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाने एका महिलेचा भररस्त्यात विनयभंग केल्याप्रकरणी त्याला अटक केली आहे. टनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहेत. सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने लोक संतप्त झालेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
माणुसकीला लाज आणणारा धक्कादायक प्रकार
तरूणाने महिलेचा मागून ड्रेस ओढत नको तेच...
Woman Harassment viral video: हैदराबादच्या तेलंगणातून माणुसकीला लाज आणणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणाने एका महिलेचा भररस्त्यात विनयभंग केल्याप्रकरणी त्याला अटक केली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहेत. सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने लोक संतप्त झाले असून या प्रकरणी आरोपीला अटकेची मागणी होताना दिसतेय.
हे ही वाचा :विद्यार्थ्याने प्रेमप्रकरणातून शिक्षिकेवर पेट्रोल ओतून जाळलं, एवढ्यावर न थांबता..
तरूणाने महिलेचा मागून ड्रेस ओढत नको तेच...
घडलेल्या घटनेनुसार हे लज्जास्पद प्रकरण नरसिंह पोलीस ठाणे परिसरात, 14 मे 2026 रोजी दुपारी दीड वाजता उघडकीस आले. अकालापूर टाऊनशिप परिसरात तरूणाने एका महिलेचा मागून ड्रेस ओढत विनयभंग केला होता. ती महिला आपल्या अडीच वर्षांच्या मुलासोबत जवळच प्लेस्कूलमधून घरी परतता होती. आरोपी नराधमाने महिलेचा मागून ड्रेस ओढला आणि विनयभंग करून घटनास्थळावरून पळ काढला.
पीडितेनं केलेल्या तक्रारीच्या आधारे, नरसिंगी पोलिसांवर गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथकांना कारवाईचे आदेश दिले. या प्रकरणी 50 ते 60 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी वड्डे नागराजू नावाच्या आरोपीचा शोध घेतला. तो गांधीपेट विभागातील पुपलागुडा येथील रहिवासी आहे.
हे ही वाचा : प्रशिक्षकाने खोलीत बोलावलं अन्.., 17 वर्षीय बॉक्सरसोबत काय घडलं?
दरम्यान, देशभरात महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटना सातत्याने होताना दिसत आहेत. सार्वजनिक ठिकाणी दिवसाढवळ्या देखील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलीपासून तरुणी, तसेच विवाहित महिला ते वृद्ध महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.









