विद्यार्थ्याने प्रेमप्रकरणातून शिक्षिकेवर पेट्रोल ओतून जाळलं, एवढ्यावर न थांबता..

मुंबई तक

Crime News : शिक्षक आणि विद्यार्थी या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 18 वर्षीय दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याने प्रेमप्रकरणातून शिक्षिकेवर पेट्रोत ओतून तिला पेटवून दिले, ज्यात ती गंभीरपणे भाजली गेल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी दिली होती.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

शिक्षण आणि विद्यार्थी नात्याला काळिमा

point

विद्यार्थ्याने प्रेमप्रकरणातून शिक्षिकेवर पेट्रोल ओतलं

Crime News : शिक्षक आणि विद्यार्थी या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 18 वर्षीय दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याने प्रेमप्रकरणातून शिक्षिकेवर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले, ज्यात ती गंभीरपणे भाजली गेल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी दिली होती. 26 वर्षीय शिक्षिका 25 टक्के भाजली गेली आहे. तिला पुढील उपचारासांसाठी जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. उपधीक्षक संदीप भुरिया यांनी सांगितलं की, आरोपीला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे ही वाचा : Astrology : शुक्र आणि केतूच्या युतीने 'या' राशींच्या अडचणीत वाढ होणार

महिनाभरापूर्वीच शिक्षिका रुजू झाल्या

पुढे त्यांनी सांगितलं की, संबंधित प्रकरण प्रेमप्रकरणाशी संबंधित आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. जबाबानंतर समोर येणाऱ्या तथ्यांच्या कारवाईच्या आधारे कारवाई केली जाणार आहे. भुरिया यांनी सांगितलं की, परीक्षा उत्तीर्ण केली होती, तर शिक्षिका स्मृती दीक्षित या केवळ महिनाभरापूर्वीच लॅब टेक्निशियन तसेच शिक्षिका म्हणून रुरू झाल्या होत्या. त्यांनी सांगितलं की, या घटनेनं मोठा धक्का बसला आहे. 

हे ही वाचा : प्रशिक्षकाने खोलीत बोलावलं अन्.., 17 वर्षीय बॉक्सरसोबत काय घडलं?

असाच धक्कादायक प्रकार उघडकीस 

असाच आणखी एक धक्कादायक प्रकार हरयाणात उघडकीस आला आहे.  एका 19 वर्षीय शिक्षिका मनीषा हिचा मृतदेह 23 ऑगस्ट रोजी सिंघानी गावात एका शेतात आढळून आला होता. तिचा गळा चिरून तिचा खून करण्यात आला होता. या घटनेनंतर नागरिकांनी आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे, यामुळे भिवानी आणि चरखी दादरी गाव परिसरातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. मनीषा 11 ऑगस्ट रोजी नर्सिंग कॉलेजला जाण्यासाठी शाळेतून निघाली होती, पण ती कधीच घरी परतली नाही. या हत्येनं मोठा हादरा बसला आहे.

हे वाचलं का?