Astrology : शुक्र आणि केतूच्या युतीने 'या' राशींच्या अडचणीत वाढ होणार
Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै 2026 एक महत्त्वपूर्ण ग्रहयोग जुळणार आहे. आनंद, समृद्धी, प्रेम आणि आकर्षणाचा ग्रह शुक्र 4 जुलै 2026 रोजी सिंह राशीत प्रवेश करेल. रहस्य, अलिप्तता आणि भ्रमाचे प्रतीक असलेला केतू आधीपासून सिंह राशीत असेल. ज्यामुळे या दोन ग्रहांमध्ये निकटचा संयोग निर्माण होईल.
ADVERTISEMENT

1/5
ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै 2026 एक महत्त्वपूर्ण ग्रहयोग जुळणार आहे. आनंद, समृद्धी, प्रेम आणि आकर्षणाचा ग्रह शुक्र 4 जुलै 2026 रोजी सिंह राशीत प्रवेश करेल. रहस्य, अलिप्तता आणि भ्रमाचे प्रतीक असलेला केतू आधीपासून सिंह राशीत असेल. ज्यामुळे या दोन ग्रहांमध्ये निकटचा संयोग निर्माण होईल.

2/5
शुक्र आणि केतूची युती कधीकधी नातेसंबंध आणि भावनिक जीवनात अस्थिरता आणू शकते. या काळात लोकांना प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन आणि वैयक्तिक निर्णयात गोंधळ किंवा अनिर्णयक्षमतेचा सामना करावा लागणार आहे. अचानकपणे गैरसमज होण्याची शक्यता असते.

3/5
वृषभ
वृषभ राशीसाठी काही आव्हाने घेण्यात येण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात चढ-उतार निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे मानसिक ताण निर्माण होऊ शकतो. वाढत्या खर्चाचा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होण्याची अधिक शक्यता आहे. अशातच खर्चाचे नियोजन करणे गरजेचे असणार आहे.

4/5
सिंह
सिंह राशीतील बदलाने तिचे परिणाम अधिक तीव्रतेने जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चिडचिडेपणा गोंधळ आणि निर्णय घेण्याची अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे चालू असलेल्या कामावर परिणाम होण्याची अधिक शक्यता आहे. नात्यातील गैरसमज देखील वाढवण्याची शक्यता आहे.

5/5
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ संमिश्र परिणाम देण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांनी कार्यालयीन राजकारण आणि अनावश्यक वाद टाळावेत. मालमत्ता आणि वडिलोपार्जित बाबींवरून तणाव निर्माण होऊ शकतो. यामुळे नातेसंबंध ताणले जाऊ नयेत, तेव्हा आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे.









