गावातल्या दुसऱ्या धर्मातील मुलावर जीव जडला, निष्पाप क्रांतीसोबत भयंकर घडलं!
Honor Killing : प्रेमसंबंधांच्या वादातून वडिलांनी आणि दोन भावांनी मिळून आपल्या 18 वर्षीय मुलीची गळा आवळून हत्या केली. मुलीच्या मृतदेहावर गुपचूप अंत्यसंस्कार करण्याची तयारी असतानाच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हे भयानक हत्याकांड उघडकीस आणले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गावातल्या दुसऱ्या धर्मातील मुलावर जीव जडला
निष्पाप क्रांतीसोबत भयंकर घडलं!
Crime News : एका 18 वर्षीय मुलीची तिच्याच वडिलांनी आणि सख्या भावांनी गळा आवळून हत्या केली आहे. क्रांती असे या मृत तरुणीचे नाव असून, तिचे गावातीलच एका दुसऱ्या धर्मातील तरुणासोबत प्रेमसंबंध होते. तिला त्याच तरुणाशी लग्न करायचे होते, मात्र ही गोष्ट तिच्या घरच्यांना मान्य नव्हती. 24 मे रोजी तिचे वडील महेंद्र यांनी तिला प्रियकराशी फोनवर बोलताना पकडले होते. या रागाच्या भरात वडिलांनी तिचा मोबाईल हिरावून घेतला आणि तिची अमानुष मारहाण केली. या घटनेनंतर काही दिवसांतच, मंगळवारी रात्री पिता महेंद्र आणि तिचे दोन भाऊ आकाश व अमन यांनी मिळून क्रांतीची गळा आवळून हत्या केली. रक्ताच्या नात्याचा विचार न करता त्यांनी आपल्याच मुलीच्या जीवनाचा अंत केला.
हेही वाचा : सांगली : रुग्णालयाचं ड्रेनेज तुंबल्याने सफाई, पण भयंकर दृश्य दिसलं अन् सगळे हादरले
अंत्यसंस्कारावेळी पोलिसांचा हस्तक्षेप; शवविच्छेदनातून सत्य उघड
हत्येचा गुन्हा लपवण्यासाठी वडील महेंद्र यांनी संपूर्ण गावात क्रांतिचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याचा खोटा कांगावा केला. कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्यांनी गुपचूप अंत्यसंस्कार करण्याची तयारी पूर्ण केली होती. मात्र, एका सतर्क ग्रामस्थाने या संशयास्पद मृत्यूची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच सिरौली पोलीस दलाने श्मशान घाटाकडे धाव घेतली आणि चिता पेटवण्यापूर्वीच मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी (पोस्टमॉर्टम) केली असता, आजारपणाचा हा सर्व खोटा बनाव उघडा पडला. क्रांतीचा मृत्यू आजारपणामुळे नसून गळा आवळल्यामुळे श्वास कोंडून झाल्याचे स्पष्ट झाले. तिच्या गळ्यावर मारहाणीच्या आणि दाबल्याच्या खोल खुणा सापडल्याने हे 'ऑनर किलिंग' असल्याचे सिद्ध झाले. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेली येथून उघडकीस आली आहे.
हेही वाचा : नवरा, सासूसह चौघांना क्रूरपणे संपवलं, नंतर रडण्याचं नाटक; 'ही' महिला का झाली निर्दयी?









