दीड वर्षे शरीसंबंध, नंतर 3 वेळा गर्भपात, लग्नाचे आमिष दाखवून बिल्डरच्या मुलावर बलात्काराचा आरोप
crime news : नामांकित बिल्डरच्या मुलाने एका तरुणीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले. तो एवढ्यावर न थांबता तिला एक दोन वेळा नाही,तर तब्बल तीन वेळा गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बिल्डरकडून लग्नाचे खोटे आमिष
बिल्डरने शरीरसंबंध निर्माण करून लग्नास दिला नकार
Crime News : नामांकित बिल्डरच्या मुलाने एका तरुणीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले. तो एवढ्यावर न थांबता तिला एक दोन वेळा नाही,तर तब्बल तीन वेळा गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप आहे. पीडितेचा असा आरोप की, पोलीस आयुक्तांना विनंती केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित प्रकरण उत्तर प्रदेशातील भोपाळमधील आहे.
हे ही वाचा : Asha Bhosale : वयाच्या दहाव्या वर्षी पहिले गाणे, सोळाव्या वर्षी लग्न, आशा भोसले यांचे आयुष्य नव्हते सोपे
लग्नाचे आमिष दाखवून बिल्डरने तरुणीचे केले लैंगिक शोषण
शहरातील नामांकित बिल्डरकडे कामाला लागल्यानंतर एका तरुणीशी मोठी गद्दारी झाली. पीडितेचा असा आरोप की, बिल्डरच्या मुलाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिला फसवले. त्याने मैत्रीचा हात पुढे केला, पण नंतर शरीरसंबंध ठेवत लैंगिक अत्याचार केले. तिला एमपी नगरातील नामांकित हॉटेलमध्ये नेण्यात आले, जिथे तिची अनेकदा अब्रू लुटली.
पीडितेसाठी न्यायाचा मार्ग सोपा नव्हता, संबंधित प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात अर्ज दाखल करूनही बराच काळ झाला तरीही सुनावणी झाली नाही. अखेरीस, एसीपीने केलेल्या तपासानंतर एमपीनगर पोलीस ठाण्यात एफआरआय दाखल केला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आश्वासन देत आहेत.
पोलिसांनी संबंधित प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पण धतिंगगिरी करणाऱ्या लोकांविरुद्ध पोलिसांना कारवाई करण्यास इतका वेळ का लागतो? पीडिता अद्यापही त्याच क्षणाची वाट पाहत आहे. दरम्यान, लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात अतिरिक्त डीसीपी म्हणाले, एमपीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









