मुलीच्या मृतदेहासोबत चार महिने घरात राहिले, दुर्गंधी येऊ नये म्हणून परफ्यूमचा वापर; वडिलांना नेमकं काय करायचं होतं?

मुंबई तक

एका बंद घरामध्ये तब्बल चार महिन्यांनंतर एका 34 वर्षीय तरुणीचा कुजलेला मृतदेह आढळला आहे. धक्कादायक म्हणजे, तरुणीच्या मृत्यूनंतर तिचे वडील काही दिवस त्याच मृतदेहासोबत घरात राहिले आणि त्यानंतर घराला कुलूप लावून निघून गेले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

मुलीच्या मृतदेहासोबत चार महिने घरात राहिले

point

दुर्गंधी येऊ नये म्हणून परफ्यूमचा वापर

point

वडिलांना नेमकं काय करायचं होतं?

Crime News : उत्तर प्रदेशातील मेरठमधून एक अशी हृदयद्रावक घटना समोर आली आहे, ज्याने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. येथे एका बंद घरामध्ये तब्बल चार महिन्यांनंतर एका 34 वर्षीय तरुणीचा कुजलेला मृतदेह आढळला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, तरुणीच्या मृत्यूनंतर तिचे वडील काही दिवस त्याच मृतदेहासोबत घरात राहिले आणि त्यानंतर घराला कुलूप लावून फरार झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव प्रियांका होते आणि ती उच्चशिक्षित होती. तिचे वडील उदय भान बिस्वास हे शिक्षण विभागातून निवृत्त झाले असून मूळचे बंगालचे रहिवासी आहेत. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांकाचा मृत्यू डिसेंबर 2025 मध्ये आजारपणामुळे झाला होता. मुलीच्या निधनामुळे प्रचंड दु:खात असल्याने आपण घर सोडून निघून गेलो, असा दावा वडिलांनी केला.

प्रकरणाला मिळाले वेगळे वळण

गेल्या चार महिन्यांपासून वडील आणि मुलगी दोघांचाही काहीच पत्ता लागत नव्हता. वारंवार फोन करूनही संपर्क होत नसल्याने नातेवाईक चिंतेत होते. त्यांनी आजूबाजूलाही चौकशी केली, पण काहीच माहिती मिळाली नाही. शुक्रवारी (10 एप्रिल) अचानक या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले, जेव्हा तरुणीचे वडील मेरठमधील बेगम बाग भागातील एका चहाच्या टपरीवर बसलेले आढळले. त्यांच्या पुतण्याने, विश्वजीतने त्यांना ओळखले आणि इतर नातेवाईकांना बोलावून घेतले. जेव्हा वडिलांना मुलीबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी ती डेहराडूनमधील एका रुग्णालयात दाखल असल्याचे सांगितले.

हे ही वाचा : 'अहो, बॅग पडली..' नवऱ्याने बाईक थांबवली अन् फसला, 23 वर्षीय बायकोने कसा काढला नवऱ्याचा काटा?

सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली

मात्र, नातेवाईकांना त्यांच्या बोलण्यावर संशय आल्याने त्यांनी कसून चौकशी केली. त्यानंतर वडिलांनी जे सत्य सांगितले ते ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. त्यांनी कबूल केले की मुलीचा मृत्यू चार ते पाच महिन्यांपूर्वीच झाला असून तिचा मृतदेह घरातच पडलेला आहे. या खुलाशानंतर तातडीने 112 क्रमांकावर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला असता, तरुणीचा पूर्णपणे कुजलेला मृतदेह बेडवर पडलेला दिसला. घरामध्ये कचरा आणि रद्दीचा खच पडला होता आणि मृतदेहाचा तीव्र दुर्गंध येत होता.

हे वाचलं का?