'अहो, बॅग पडली..' नवऱ्याने बाईक थांबवली अन् फसला, 23 वर्षीय बायकोने कसा काढला नवऱ्याचा काटा?

मुंबई तक

एका 23 वर्षीय विवाहित तरुणीचे 7 वर्षांपासून अफेयर सुरु होते. यामुळे आपल्या नवऱ्याचा अडसर दूर करण्यासाठी तिने बॉयफ्रेंडसोबत मिळून कट रचला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

अहो, बॅग पडली..

point

नवऱ्याने बाईक थांबवली अन् फसला

point

बायकोने कसा काढला नवऱ्याचा काटा?

Crime News : मध्य प्रदेशातील भिंडमध्ये एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे एका 23 वर्षीय महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या घडवून आणली. यानंतर या महिलेने ही घटना लुटीचा प्रकार असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र, जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली, तेव्हा या धक्कादायक कटाचा पर्दाफाश झाला.

हे संपूर्ण प्रकरण अटेर पोलीस ठाणे परिसरातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 एप्रिल रोजी काही बदमाशांनी एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती मिळाली होती. निलेश (27 वर्षे) असे मृताचे नाव असून, तो आपली पत्नी रुबी आणि मुलासह दुचाकीवरून जात असताना ही घटना घडली. घटनेनंतर रुबीने पोलिसांना सांगितले की, ते जमना गावातून खरिका येथे जात होते. वाटेत अचानक तिची बॅग रस्त्यावर पडली, त्यामुळे तिने पतीला गाडी थांबवण्यास सांगितले. निलेशने गाडी थांबवली आणि रुबी बॅग उचलण्यासाठी खाली उतरली, तेव्हाच मागून दोन अज्ञात व्यक्ती आल्या आणि त्यांनी तिच्या पतीवर गोळ्या झाडल्या. यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

सुरुवातीला हत्येचा गुन्हा

रुबीने सांगितलेल्या या कथेच्या आधारावर पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सुरुवातीला हे प्रकरण लूट आणि हत्येचे वाटत होते, परंतु तपासादरम्यान पोलिसांना काही गोष्टींविषयी शंका आली. भिंडचे पोलीस अधीक्षक असीत यादव यांनी सांगितले की, चौकशीदरम्यान ही महिला वारंवार आपले जबाब बदलत होती आणि त्यात अनेक विसंगती आढळल्या. त्यानंतर पोलिसांनी अधिक कडकपणे चौकशी केली असता हळूहळू सत्य समोर आले.

हे ही वाचा : शिंदेंच्या मुलाखतीचा उल्लेख, बाळासाहेबांची व्यंगचित्रे, कुणाल कामरा हक्कभंग समितीला दिलेल्या उत्तरात काय म्हणाला?

सात वर्षांचे प्रेमसंबंध

तपासात असे निष्पन्न झाले की, रुबीचे तिच्याच एका नातेवाईकासोबत, विशाल विमलसोबत गेल्या सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही या दोघांमधील संवाद सातत्याने सुरू होता. ते व्हॉट्सॲप कॉल आणि चॅटच्या माध्यमातून संपर्कात राहायचे. काळानुसार रुबीला वाटू लागले की तिचा पती निलेश त्यांच्या नात्यात अडथळा ठरत आहे. त्यामुळे तिने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीचा काटा काढण्याचा कट रचला.

हे वाचलं का?