भयंकर! जालन्यात आईला मेसेज केल्याच्या रागातून मुलाने मित्राचीच केली हत्या, हादरवून टाकणारी घटना
Jalna Crime : जालन्यात आईला मेसेज केल्याच्या रागातून मुलाने मित्राचीच हत्या केली. संबंधित प्रकरण हे जालन्याच्या शिरसवाडी येथील असून घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. निखिल अनिल वाघमारे (वय 27) या तरुणीची त्याच्याच अल्पवयीन मित्राने मानेवर धारदार शस्त्राने सपासप वार करत हत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आईला मेसेज केल्याच्या रागातून तरुणाने मित्राचीच हत्या केली
जालना जिल्हा हादरला
Jalna Crime : गौरव साळी - जालन्यात आईला मेसेज केल्याच्या रागातून मुलाने मित्राचीच हत्या केली. संबंधित प्रकरण हे जालन्याच्या शिरसवाडी येथील असून घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. निखिल अनिल वाघमारे (वय 27) या तरुणीची त्याच्याच अल्पवयीन मित्राने मानेवर धारदार शस्त्राने सपासप वार करत हत्या केली. या प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले. निखिल वाघमारे आणि संबंधित अल्पवयीन मुलगा हे जवळचे मित्र होते.
हे ही वाचा : शिंदेंच्या मुलाखतीचा उल्लेख, बाळासाहेबांची व्यंगचित्रे, कुणाल कामरा हक्कभंग समितीला दिलेल्या उत्तरात काय म्हणाला?
मित्राच्या आईच्या मोबाईलवर मेसेज केल्याने तरुणाने मित्राला संपवलं
दोघेहे एकमेकांना चांगले ओळखत असून एकमेकांच्या घरी ये- जा सुरु होते. अशातच निखिलने मित्राच्या आईच्या मोबाईलवर मेसेज केला. संबंधित मेसेज पाहून त्या महिलेचा मुलगा रागाने लालबुंद झाला. संतापाच्या भरात त्याने निखिलवर जीवघेणा हल्ला केला. रात्री अंधाराचा फायदा घेत शिरसवाडी भागात शेतातील घरासमोर निखिल झोपलेल्या अवस्थेत आढळून आला होता. तेव्हा, त्या मुलाने निखिल झोपला असताना चाकूने वार करत संपवलं.
हे ही वाचा : पुण्याची गोष्ट : पुणेकरांनो महिनाभर हा पूल राहणार बंद, 'या' पर्यायी मार्गांचा करू शकता वापर
अल्पवयीन मुलाने गुन्ह्याचा कबुलीनामा देत सांगितला घटनेचा थरार...
या घटनेची माहिती तालुका जालना पोलिसांना समजताच पोलिसांनी कारवाई करत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान हल्लोखार मुलाने गुन्ह्याचा कबुलीनामा दिला. 'मित्राने आईला मेसेज केला म्हणून मी त्याची हत्या केली', असे त्याने सांगितले. सदर अल्पवयीन मुलाला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते, या प्रकरणाची पुढील कारवाई सुरु असल्याची माहिती तालुका जालना पोलीस ठाणे निरीक्षर पोलीस संतोष साबळे यांनी दिली. शिरसवाडीतील या घडलेल्या घटनेनं जालना जिल्हा हादरून गेल्याचे वृत्त आहे. या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.









