नागपूर: हुंड्याच्या छळाला कंटाळून पीडितेनं ब्लँकेटनं गळफास घेत संपवलं जीवन; सासरच्यांकडून सुनेचा हुंडाबळी
Nagpur crime : नागपूरमधील गणेशपेठ पोलीस ठाणे परिसरात हुंड्याच्या छळाला कंटाळून एका महिलेनं जीवन संपवलं. या घटनेनं पोलिसांनी मृत महिलेच्या सासरच्या चार सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. संबंधित मृत महिलेची ओळख सना अंजुम अकील खान (वय 26) अशी आहे, या घटनेनं घटनास्थळ हादरून गेलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नवऱ्याकडून पीडितेकडे हुंड्याची मागणी
छळाला कंटाळून राहत्या घरी ब्लँकेटच्या साहाय्याने गळफास घेत संपवलं जीवन
Nagpur Crime : नागपूरमधील गणेशपेठ पोलीस ठाणे परिसरात हुंड्याच्या छळाला कंटाळून एका महिलेनं जीवन संपवलं. या घटनेनं पोलिसांनी मृत महिलेच्या सासरच्या चार सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. संबंधित मृत महिलेची ओळख सना अंजुम अकील खान (वय 26) अशी आहे. या घटनेनं घटनास्थळ हादरून गेलं आहे.
हे ही वाचा : हिंगोली: अशी आई असल्यापेक्षा नसलेली बरी, प्रियकराच्या नादी लागून पोटच्या लेकराला संपवलं
नवऱ्याकडून पीडितेकडे हुंड्याची मागणी
संबंधित प्रकरणात सनाचा विवाह हा 2024 या वर्षी शोएब, उर्फ सैफ अयुब खान (वय 30) याच्याशी झाला होता. विवाहापासून पती, सासरा नसीम आयुब खान (वय 57), सासू (वय 54) आणि नणंद समीना उर्फ सोनी अनीस खान (वय 35) हे सतत हुंड्यासाठी पीडितेकडे पैशांची मागणी करत होते, असा आरोप आहे. याच कालावधीत सनाचा मानसिक आणि शारीरक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला.
छळाला कंटाळून राहत्या घरी ब्लँकेटच्या साहाय्याने गळफास घेत संपवलं जीवन
या असह्य छळाला कंटाळून सनाने 7 एप्रिल रोजी सायंकाळी 5:00 वाजता आपल्या राहत्या घरी एका ब्लँकेटच्या साहाय्याने गळफास घेत जीवन संपवलं. संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच, गणेशपेठ पोलिसांनी पतीसह चारही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या कलमांन्वये गुन्हा दाखल केला.
हे ही वाचा : अंबरनाथ: सिमरनचं बॉससोबत सुरु होतं 'गुटरगू', ब्रेकअपनंतर नैराश्यात येऊन हॉटेलच्या खोलीत गळफास घेत संपवलं जीवन
या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास सुरु आहे. हा तपास पोलीस उपनिरीक्षक नीलम घोडके यांच्यामार्फत केला जात असल्याची माहिती आहे. आपण 21 व्या शतकात राहत असलो तरीही महिलांच्या सुरक्षेचा आणि हुंड्यांसारख्या प्रथांचे प्रश्न आजही समोर येऊ लागले आहेत.









