प्रेमविवाहातून सासऱ्याने सुनेचा केला खून, पुरावा लपवण्यासाठी मृतदेह सिंटेक्सच्या टाकीत टाकला, नंतर...
Crime News : सासऱ्याने सुनेचा प्रेम विवाहाच्या रागातून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सासऱ्याने सुनेचा प्रेम विवाहाच्या रागातून खून केला
घटनेनं परिसरात खळबळ
पोलिसांना दिला कबुलीनामा
नेमकं काय घडलं?
Crime News : सासऱ्याने सुनेचा प्रेम विवाहाच्या रागातून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह एका घरातील सेप्टीक टँकमध्ये टाकला आणि प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना छत्तीसगडमधील कवर्धा जिल्ह्यात उघडकीस आल्याचे वृत्त आहे. या प्रकरणातील आरोपी सासरा असून त्याचं नाव जहाल पटेल असे आहे.
हे ही वाचा : टिटवाळा हादरलं! रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेला पिकअपने चिरडलं, महिलेचा दुर्दैवी अंत
नेमकं काय घडलं?
संबंधित अहवालानुसार, मृत महिला ही अनेक दिवसांपासून घरी दिसत नव्हती. तिच्या पतीने काळजीपोटी पोलीस ठाणे गाठून पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा शोध सुरु केला असता, जवळजवळ एक महिनाभर कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. दरम्यान, गावातील अनेक अफवा पसरू लागल्या होत्या, परंतु हे रहस्य उलगडलं.
सासऱ्याने पोलिसांना घटनेचा कबुलीनामा दिला...
या प्रकरणातील आरोपी सासरा जहाल पटेल अचानकपणे पोलीस ठाण्यात आला आणि त्याने संपूर्ण घटनेची पोलिसांना माहिती दिली, नंतर कबुलीनामा दिला होता. या घटनेनं भयानकपणे वळण घेतलं होतं. त्याने स्पष्ट केलं की, त्याला त्याच्या सुनेचा त्याच्या मुलाशी प्रेमविवाह मान्य नव्हता, कारण मुलगी ही इतर सुमदायाची होती. हाच द्वेष मनात धरून त्याने तिचा खून केला आणि संशय येऊ नये म्हणून तिचा मृतदेह घराच्या सेप्टीक टँकमध्ये फेकून देण्यात आला होता.
हे ही वाचा : महाराष्ट्रातून लहान मुलं, मुली पळवल्या जातायत, राज ठाकरेंनी एनसीआरबी अहवालाचा दाखला देत फडणवीसांना सुनावलं..
पोलिसांचे पथक ताबडतोब आरोपीच्या घरी पोहोचले आणि सेप्टीक टँकमध्ये उघडण्यास सांगितले. टँक उघडताच, आत सुनेचा कुजलेला मृतदेह आढळून आला होता. हे बघून पोलिसांसह गावकऱ्यांच्या देखील थरकाप उडाला. या घटनेनं संपूर्ण गाव हादरून गेले होते. आरोपी सासऱ्याला पोलिसांनी अटक केली. तसेच प्रेमविवाहाच्या वैयक्तिक वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचे वृत्त समोर आले. या प्रकरणात मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून फॉरेन्सिक पथक घटनेचा तपास करत आहे.










