"19 डिसेंबर रोजी काय होईल, ते कठीण.." मराठी पंतप्रधानाबद्दल पृथ्वीराज चव्हाणांनी केलेला मोठा दावा

मुंबई तक

Pruthwiraj chavan : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान पदाबाबत मोठं विधान केलं आहे. 'लवकरच देशाचा पंतप्रधान हा मराठी माणूस होईल', असं त्यांनी पिंपरी-चिंचवड येथील एका कार्यक्रमात वक्तव्य केलं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Pruthwiraj chavan : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान पदाबाबत मोठं विधान केलं आहे. 'लवकरच देशाचा पंतप्रधान हा मराठी माणूस होईल', असं त्यांनी पिंपरी-चिंचवड येथील एका कार्यक्रमात वक्तव्य केलं. या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसतेय. 

हे ही वाचा : 'या' राशीतील लोकांचा आजचा दिवस कठीण जाणार, तर काहींच्या प्रगतीत अडथळे निर्माण होणार

नेमकं काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "19 डिसेंबर रोजी काय होईल, ते आताच सांगणं कठीण आहे. याच प्रकरणात अनेक चर्चा सुरु आहेत. मला आशा आहे की काहीतरी नक्कीच घडेल. जर ते घडले तर ते चांगले होईल. एक मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल."

त्यानंतर त्यांनी सांगितलं की, "काही लोकांनी फोन करून विचारलं की, या वक्तव्याचा नेमका काय अर्थ लावायचा. जर मराठी व्यक्तीला पंतप्रधान बनवायचं असेल तर, सध्या जे पंतप्रधान आहेत, त्यांना ते पद सोडावं लागणार आहे. ही गोष्टी याआधी देखील नाव न घेता सांगितली होती. कुठेतरी यात बदल दिसून येईल, अशी शक्यता आहे. अशातच जरी बदल झाला तरी पंतप्रधान काँग्रेसचा नसेल कारण काँग्रेसला बहुमत नाही.

अमेरिकेतील एका कायद्याचा संदर्भ देत चव्हाण म्हणाले की, ''19 डिसेंबर रोजी अमेरिकन काँग्रेसमधील एका कायद्यांतर्गत काही महत्त्वाची माहिती सार्वजनिक केली जाईल. एलस्टाईन नावाच्या व्यक्तीशी संबंधित प्रकरणात मोठे खुलासे अपेक्षित आहेत. अनेक प्रमुख राजकारण्यांची नावे चर्चेत आली आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp