ठाकरे बंधूंच्या अधिकृत युतीच्या घोषणेसाठी तारीख निश्चित; संजय राऊत आणि राज ठाकरेंच्या बैठकीत मोठा निर्णय

मुंबई तक

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray and Raj Thackeray MNS alliance announcement, मुंबई : दरम्यान, दोन्ही ठाकरे बंधू आजपासून उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात करणार आहेत. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना 23 डिसेंबरपासून थेट बोलावून एबी फॉर्म देण्यात येणार आहेत.

ADVERTISEMENT

  Shivsena Uddhav Balasaheb Thackeray and Raj Thackeray MNS
Shivsena Uddhav Balasaheb Thackeray and Raj Thackeray MNS
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ठाकरे बंधूंच्या अधिकृत युतीच्या घोषणेसाठी तारीख निश्चित

point

संजय राऊत आणि राज ठाकरेंच्या बैठकीत मोठा निर्णय

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray and Raj Thackeray MNS alliance announcement, मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आलेले पाहायला मिळत होते. मात्र, त्यांच्या अधिकृत युतीची घोषणा झाली नव्हती. मात्र, राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची निवडणूक आयोगाकाकडून घोषणा करण्यात आल्यानंतर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या अधिकृत युतीची घोषणा कधी होणार? याची तारीख देखील समोर आली आहे. खासदार संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर मोठा निर्णय घेण्यात आलाया. नेमकं काय ठरलंय? सविस्तर जाणून घेऊयात... 

राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक होणार असली तरी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर राज्याचं लक्ष असणार आहे. 74 हजार कोटींचं बजेट असलेल्या मुंबई महापालिकेवर पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी ठाकरे बंधूंनी खास प्लॅन आखलाय. तर दुसरीकडे भाजपने देखील ग्राऊंड लेव्हल पासून नेत्यांची जुळवाजुळव सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसलीये.

हेही वाचा : शेतकऱ्याने कंबोडियाला जाऊन का विकली किडनी? हादरवून टाकणारी कहाणी जशीच्या तशी...

हे वाचलं का?

    follow whatsapp